Jagadish Chandra Bose | बिनतारी टेलिग्राफीचे 'बोस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jagadish Chandra Bose

आज जागतिक किर्तीच्या या महान संशोधकाचा स्मृतीदिन. विनम्र अभिवादन.

Jagadish Chandra Bose | बिनतारी टेलिग्राफीचे 'बोस'

sakal_logo
By
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

‘वनस्पतीतही जीव असतो’या अनुषंगाने जगदिशचंद्र बोस यांची गोष्ट आणि त्यांचे कार्यकर्तृत्व बहुतांश लोकांना माहितच असेल त्यामुळे आज गोष्ट नाही पण काही लोकांना कदाचित माहित नसेल असा किस्सा सांगतो. त्यांच्या वनस्पतीशास्रातील संशोधनाखेरीज एक वादही जोडलाय. ‘रेडिओ’अर्थात बिनतारी यंत्रणेच्या शोधाचं श्रेय नेहमीच १९०९ ला या शोधासाठी ‘नोबेल’मिळवणाऱ्या इटालियन संशोधक ‘मार्कोनी’ला दिलं जात असलं तरी विज्ञानविश्वात एक वदंता आहे की, हा शोध प्रा.बोस यांनी मार्कोनी आधीच लावून ठेवला होता, पण वांशिक भेदामुळे त्यांना या शोधाचं श्रेय दिलं गेलं नाही.

हेही वाचा: भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी

१८९६-१८९७ ला मार्कोनी आणि प्रा.बोस हे दोघंही लंडनला हजर होते. एका बाजूला मार्कोनी ब्रिटिश पोस्ट ऑफिससाठी बिनतारी यंत्रणा बनवण्याचा प्रयत्न करत होता तर दुसऱ्या बाजूला प्रा.बोस आपल्या अध्यापन दौऱ्यावर होते. तत्कालिन प्रस्थापित ‘मॅक्लर’या विशेषांकात १८९७ ला मार्चच्या महिन्यात या दोघांची संयुक्त मुलाखतही झाली ज्यात बोस यांनी मार्कोनीची प्रशंसाही केलीये ती ही तेव्हा जेव्हा ब्रिटिश संशोधक अपुर्ण शिक्षण आणि कमी गुणांमुळे त्याची खिल्ली उडवत होते. सोबत बोस यांनी आपल्याला व्यावसायीक टेलिग्राफीत अजिबात रस नसल्याचंही कबूल केलंय.

१८९९ ला प्रा.बोस यांनी ‘मर्क्युरी कोहेनन विथ टेलीफोन डिटेक्टरी’या तंत्रज्ञानाबद्दल आणि काम करण्याच्या पद्धतीवर ‘रॉयल सोसायटी’त एक संशोधन पत्रिकाही प्रकाशित केली पण कर्मधर्मसंयोगानं त्यांची ‘डायरी’हरवली ज्यात या संशोधनाबाबतची इत्यंभूत माहिती लिहून ठेवली होती. दुसऱ्या बाजूला मार्कोनीला या शोधाच्या व्यावसायिक फायद्यांची कल्पना आली आणि त्यानं आपला बालमित्र लुईस सोलारी याला सोबत घेत एक उत्कृष्ठ आराखडा तयार केला.

१९०१ ला मार्कोनीनं जगासमोर ठेवलेलं तंत्र प्रा.बोस यांच्या नोंदींवर आधारीत होतं. मार्कोनीनं ब्रिटनमध्ये याचं पेटंट घेतलं आणि नोबेलही मिळवला पण चुकूनही याचं श्रेय प्रा.बोस यांना कधीच दिलं नाही.

हेही वाचा: 'व्हिटॅमिन्स'चा शोध लावणाऱ्या कॅसिमिर फंक यांची कहाणी

रॉयल सोसायटीकडे बोस यांची प्रकाशित संशोधन पत्रिका होतीच पण अंतर्गत राजकारणामुळे आणि वंशवादामुळे कुणीही या गुणी भारतीयाच्या पाठीशी उभा राहिला नाही. सरतेशेची एक प्रतिष्ठित अमेरिकन संस्था IEEE अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल ॲंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स यांनी प्रा.बोस यांना तब्बल १०० वर्षांनतर या कामाचं श्रेय दिले पण भारतीयांच्या शिरपेचातला अजून एक नोबेलरुपी तुरा मात्र खोचायचा राहिला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मात्र चंद्रावरही कोरला गेलाय. ९१ किमी व्यासाचं एक विवर ‘बोस’या नावानं ओळखलं जातं.

loading image
go to top