Strawberry Moon : आज भारतात दिसणार स्ट्रॉबेरी मून; 18 वर्षानंतर दुर्मिळ योग, कुठे अन् किती वाजता पाहाल? जाणून घ्या

Strawberry Moon 2025 when and where to watch : आज रात्री आकाशात स्ट्रॉबेरी मून झळकणार आहे २०४३ पर्यंत न पाहायला मिळणारी दुर्मिळ खगोलीय घटना आहे. हे पाहण्यासाठी सूर्यास्तानंतर दक्षिण-पूर्व दिशेला नजर ठेवावी लागेल
Strawberry Moon 2025
Strawberry Moon 2025 when and where to watchesakal
Updated on

Strawberry Moon 2025 Timing : आज (११ जून) आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे ज्याला म्हणतात स्ट्रॉबेरी मून. जून महिन्याचा हा पूर्ण चंद्र, केवळ ऋतूंच्या संक्रमणाचा संकेत देत नाही, तर यावर्षी तो आणखी खास आहे, कारण तो गेल्या जवळपास २० वर्षांतील सर्वात खालच्या ठिकाणी दिसणार आहे. हे दृश्य पुन्हा एकदा पाहायला २०४३ पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय?

'स्ट्रॉबेरी मून' हे नाव पाहून काहींना वाटू शकतं की चंद्र लालसर किंवा गुलाबी दिसतो, पण तसं नाही. हे नाव अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन जमातींनी दिलेलं आहे. जून महिन्यात पिकणाऱ्या 'जून बेअरिंग स्ट्रॉबेरी' या फळांच्या हंगामाशी याचा संबंध आहे. त्यावेळी फळं पिकतात, फुलं बहरतात आणि हवामान उष्णतेकडे झुकतं याचं प्रतीक म्हणजे हा पूर्ण चंद्र.

यंदाचा स्ट्रॉबेरी मून इतका खास का?

स्ट्रॉबेरी मून नेहमीच थोडक्‍या उंचीवर दिसतो, पण यंदाचा चंद्र ‘मेजर लुनार स्टँडस्टिल’ या दुर्मिळ खगोलीय घटनेमुळे अधिकच नीचांकी स्थानावरून दिसणार आहे. याचा अर्थ चंद्र पूर्व-दक्षिण दिशेच्या अगदी जवळ दिसेल. या प्रकारची घटना दर १८ वर्षांनी घडते आहे.

Strawberry Moon 2025
Shubhanshu Shukla Update : शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन राकेश शर्मा यांच्या मोहिमेपेक्षा वेगळं कसं आहे? चला जाणून घेऊया..

भारतात कुठे आणि कधी पाहायचा?

  • तारीख: ११ जून, बुधवार

  • वेळ: सूर्यास्तानंतर लगेच

  • दिशा: दक्षिण-पूर्व क्षितिजावर

  • दृश्य: चंद्र सुवर्ण छटेचा

जास्तीत जास्त स्पष्टता हवी असेल तर कमी प्रकाश प्रदूषण असलेलं ठिकाण निवडा. DSLR कॅमेरा, ट्रायपॉड किंवा दुर्बिणीचा वापर करून चंद्राचं सौंदर्य अधिक चांगलं टिपता येईल.

Strawberry Moon 2025
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये धमाकेदार फीचरची एन्ट्री; तुमच्या मोबाईलचं स्टोरेज फुल होणार नाही, पण कसं? पाहा एका क्लिकवर

जर तुम्हाला चंद्र, खगोलशास्त्र किंवा निसर्गाशी नातं असेल किंवा फक्त सुंदर दृश्यं अनुभवायला आवडत असेल तर आजचं चंद्रदर्शन चुकवू नका. हे केवळ खगोलीय घटना नाही, तर निसर्गाच्या ऋतूचक्राचं एक मनमोहक दर्शन आहे.

पुढचा असा स्ट्रॉबेरी मून २०४३ मध्ये दिसणार आहे आजच्या चंद्रदर्शनासाठी पूर्ण तयारी करा आणि ही अद्भुत रात्र आपल्या आठवणींच्या आकाशात कोरून ठेवा. जून महिन्यात दिसणारा 'स्ट्रॉबेरी मून' आज रात्री आकाशात झळकणार आहे. २०४३ पर्यंत न पाहायला मिळणाऱ्या या दुर्मिळ दृश्याचा अनुभव घेण्यासाठी आकाशाकडे नजर ठेवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com