Success Story : चालता चालता शूजमधून होईल वीजनिर्मिती; नववीच्या विद्यार्थ्याचा अनोखा शोध

टाकाऊतून त्याने हे अनोखे शूज बनवले असून मोठ्या कंपन्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.
Karnataka Electric Shoes
Karnataka Electric ShoesSakal

हुगळीच्या बारासत देपारा, चंदननगर येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने सौविक सेठ याने अशा बुटाचा शोध लावला आहे की ते घालून चालल्यावर वीज निर्माण होते. त्या विजेच्या साह्याने मोबाईल, जीपीएस ट्रॅकिंगपासून कॅमेऱ्यांपर्यंत सर्व काही चार्ज करता येतं.

पाचवीत शिकत असताना त्याच्या काकांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करताना पाहून इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्याची आवड निर्माण झाली. चंदननगर कनैलाल शाळेच्या इंग्रजी विभागाच्या सौविकला यापूर्वीही अनेक विज्ञान प्रदर्शन पुरस्कार मिळाले आहेत.

Karnataka Electric Shoes
Success Story : कोण ही तरुणी? या ग्रॅज्युएट पोरीनं उभारलं 7950 कोटींच फर्म अन् 820 कोटींची गुंतवणूक

शूज घालून चालल्याने वीज निर्माण करता येते, असा दावा सौविकने केला आहे. २००० mAh बॅटरी सहज चार्ज होईल, ही बॅटरी फक्त एक किलोमीटर चालल्यावर चार्ज होईल, असं सौविक म्हणतो. सध्या ही स्मार्ट शू प्रणाली बाहेरून केली जाते. एका महिन्याच्या आत सर्व गॅजेट्स बुटाच्या सोलमध्ये तयार होतील. आणि यासाठी शू मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची गरज आहे, जी सौविकला आर्थिक मदत करेल. (Lifestyle News)

यामुळे शूजच्या जगात नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास सौविकला वाटतो आहे. सहलीला किंवा ट्रेकिंगला निघालेल्या प्रवाशांना फायदा होईल, असंही सौविकने सांगितलं. सौविक म्हणतो, “मी टाकाऊ वस्तूंपासून हा स्मार्ट शूज बनवला आहे. या शूजमध्ये जीपीएस प्रणाली आहे जी लहान मुलांसाठी अतिशय सोयीची आहे. कधी कधी एखादं मूल हरवल्यावर अथवा अपहरण झाल्यावर ते शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. पण हे शूज त्याने घातले असतील तर तो सहज सापडेल.

Karnataka Electric Shoes
Success Story : भंगार गोळा करणारा रवी बनला उपशिक्षणाधिकारी!

एवढंच नाही तर कुटुंबातील सदस्यांना त्यांची मुले कुठं आहेत हे पाहता येईल. शूज स्पाय कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. आजूबाजूला संशयित व्यक्ती असल्यास ते सहज पाहता येतं.

मात्र, संशयास्पद व्यक्तीला त्याच्या बुटाला कॅमेरा जोडलेला आहे हे समजेल असा कोणताही मार्ग नाही. चालण्याने गतिज ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून ही वीज निर्माण होते. अनेक वेळा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी ते खूप सोयीचे असेल,” असं सौविक पुढे म्हणाला.

तो पुढे आयटीआयचा अभ्यास करण्यास इच्छुक आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीने संपर्क केल्यास माझ्या कामाचे सार्थक होईल, अशी भावना सौविकने व्यक्त केली आहे.

त्याचे वडील स्वरूप सेठ हे ज्यूट मिलचे कामगार आहेत. एवढा खर्च करणे त्याला शक्य नाही. यासाठी कोणतीही संस्था किंवा कंपनी पुढे आली तर बरे होईल. त्यांना त्यांच्या मुलाला शक्य तितकं शिकवायचं आहे. त्यांनी त्याला कधीही अडथळा आणला नाही उलट प्रोत्साहन दिलं. जेणेकरून तो आपलं काम पुढे चालू ठेवू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com