Success Story : कोण ही तरुणी? या ग्रॅज्युएट पोरीनं उभारलं 7950 कोटींच फर्म अन् 820 कोटींची गुंतवणूक

Business Success Story: कोण आहे ही तरुण सीईओ, कंपनीसाठी उभारले तब्बल 7950 कोटी
Business Success Story
Business Success Storyesakal

Business Success Story : सिंगापूरस्थित झिलिंगोच्या सह-संस्थापक अंकिती बोस यांनी भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील फसवणूक या विषयावरील त्यांच्या लेखाबद्दल गुंतवणूकदार व लेखक महेश मूर्ती यांच्यावर खटला दाखल केला आहे.

लेखक भारतातील स्टार्टअप्सना बियाणे निधी पुरवणाऱ्या कंपनीत व्यवस्थापकीय भागीदार होते. या तरुण व्यावसायिक महिलेने 20 एप्रिल रोजी खटला दाखल केला. तिने मूर्ती यांना तिच्या प्रसिद्धीस तळा जाईल असे कोणतेही लेख लिहिण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश मागितला आहे, असे ईटीने वृत्त दिले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

त्यांच्या लेखात, मूर्ती यांनी झिलिंगोला अशा स्टार्टअप्सच्या यादीत असल्याचे लिहीले होते जे फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत होते. अंकिती बोस म्हणाली की, मीडियापुढे कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचाच हा एक भाग होता. पुढे तिने असेही सांगितले की हे सगळे आरोप काल्पनिक आहेत आणि याबाबतचा पुरावाही मूर्तींकडे नाही.

कोण आहे अंकिती बोस?

अंकिती बोस ही 31 वर्षांची तरुणी, झिलिंगो या ई-कॉमर्स स्टार्टअपची सह-संस्थापक आहे. ध्रुव कपूरसोबत 2015 मध्ये झिलिंगो कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनी होलसेल खरेदीदारांना विक्रेत्यांशी जोडते. (who is Ankiti Bose)

2019 मध्ये, ते फोर्ब्सच्या Forbes 30 Under 30 list मध्ये सामील झाले. त्यांनी 226 मीलियन डॉलरची फंडींग 970 डॉलरच्या व्हॅल्युएशनवर मिळवली.

Business Success Story who is ankiti bose
Business Success Story who is ankiti bose

अंकितीनेतिचे शालेय शिक्षण मुंबईच्या केंब्रिज शाळेतून पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने गणित आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'मॅकिन्से अँड कंपनी आणि सेक्वोया' कॅपिटलमध्ये कर्मचारी म्हणून केली होती.

अंकिती एका टूरवर असताना, दक्षिणपूर्व आशियातील फॅशन मार्केटचे किरकोळ विक्रेते वित्तपुरवठा करू शकत नाहीत, वाढवू शकत नाहीत किंवा त्यांचा व्यवसाय ऑनलाइन घेऊ शकत नाहीत हे तिच्या लक्षात आले तेव्हा.

त्यामुळेच या क्षेत्रातील लोक त्यांच्या जागतिक समकक्षांच्या तुलनेत मागे होते. तिने वयाच्या 23 व्या वर्षी स्टार्टअप उघडण्यासाठी तिची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. नंतर ती सिंगापूरला गेली. 2019 मध्ये, त्यांनी 970 मीलियन डॉलर फंडींग मिळवली. (Rs 7957 crore)

Business Success Story
Success Story : आम्ही तिघी, बहिणी, सूनबाई अन् अधिकारी! पिंपळेच्या बिन्नर कुटुंबीयांतील भगिनींचे यश

तिने इंडोनेशियातील महिलांसाठी एक प्रोग्राम रन केला ज्यात त्यांना कपडे तयार करण्याच्या कलेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी देशभरात लीडरशिप क्वॉलिटी डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील सेट केले.

Business Success Story
Success Story : कमी वयात शोधला यशाचा ‘राज’मार्ग! गॉगलची क्रेझ ओळखत व्यवसायात 19व्या वर्षी भरारी

गेल्या वर्षी तिने कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी, आर्थिक अनियमिततेमुळे तिला कंपनीने निलंबित केले होते. तिने तिच्या निलंबनाला witch Huntअसे म्हटले होते. तसेच यासंबंधित तिने एक पोस्टही इंस्टाग्रामवर लिहीली होती.

“गेल्या काही महिन्यांत, अनेक विनंत्या करूनही, झिलिंगो बोर्ड मला कोणताही अहवाल (क्रोल किंवा डेलॉईटने जारी केलेला) दाखवण्यात अयशस्वी ठरला आहे जो कंपनीशी माझ्या कथित गैरवर्तनाशी संबंधित आहे. हे सगळं माझे सीईओ पद संपुष्टात आणण्यासाठी चाललंय,” अशी एक पोस्ट तिने इंस्टाग्रामवर लिहिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com