

Sunita Williams, the trailblazing NASA astronaut of Indian origin, captured during her record-setting career, having spent 608 days in space across three missions before her retirement in December 2025.
esakal
NASA SUNITA WILLAIMS : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ प्रवास आणि त्यांची प्रदीर्घ कारकीर्द ही जागतिक विज्ञान क्षेत्रातील एक सुवर्ण अध्याय आहे. २७ वर्षांहून अधिक काळ नासाशी (NASA) जोडल्या गेलेल्या सुनीता विल्यम्स यांनी नुकताच आपला सक्रिय अंतराळ प्रवास पूर्ण केला असून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तीन मोठ्या अंतराळ मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. विशेष म्हणजे २०२४ मध्ये सुरू झालेली त्यांची शेवटची मोहीम तांत्रिक कारणांमुळे दीर्घकाळ लांबली होती.. ज्यातून २०२५ मध्ये त्या सुखरूप पृथ्वीवर परतल्या. त्यांच्या या धाडसी प्रवासाचा समारोप आता कौतुकाचा विषय ठरत आहे.