

husband kill me sunita williams moon mission quote
esakal
Sunita Williams Latest Update : सुनीता विल्यम्स या केवळ एक अंतराळवीर नसून त्या ध्येयवेड्या साहसाचे दुसरे नाव आहेत. भारतीय वंशाच्या या धाडसी महिलेने आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अंतराळ विज्ञानाला नवी उंची दिली आहे. १९९८ मध्ये नासाशी जोडल्या गेलेल्या सुनीता यांनी आतापर्यंत ३ मोठ्या मोहिमा पार पाडल्या असून अंतराळात एकूण ६०८ दिवस घालवण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांच्या नावावर सात वेळा स्पेस वॉक करण्याचा आणि अंतराळात मॅरेथॉन धावण्याचा आगळावेगळा विक्रम आहे. मात्र २०२४-२५ मधील त्यांची शेवटची बोईंग स्टारलाइनर मोहीम तांत्रिक अडचणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त लांबली, ज्याने त्यांच्या संयमाची आणि कुटुंबाच्या काळजीची मोठी परीक्षा घेतली.