
Sunita Williams NASA Update : नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अंतराळ स्थानकाबाहेर दुसरा स्पेस वॉक पुढील आठवड्यात होणार आहे. 16 जानेवारी रोजी यशस्वी स्पेसवॉक पूर्ण केल्यानंतर सुनीता आता पुन्हा 30 जानेवारीला अंतराळ स्थानकाबाहेर जाणार आहेत. या वेळेस त्यांच्यासोबत फ्लाइट इंजिनिअर बुच विलमोर असतील. दोघे मिळून सुमारे 6.5 तास अंतराळ स्थानकाबाहेर काम करतील.
या मोहिमेत ते रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना काढून टाकतील तसेच स्थानकाच्या बाहेर सूक्ष्मजीवांचा शोध घेतील. नासाच्या अपडेटनुसार, अंतराळ स्थानकावर सात महिने घालवलेल्या या दोघांची मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. मार्च 2025 मध्ये त्यांची पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.
स्पेसवॉकपूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी क्वेस्ट एअर लॉकमध्ये त्यांच्या मोहिमेची सखोल तयारी केली. त्यांनी स्पेससूट हेल्मेटची देखभाल केली तसेच SAFER (Simplified Aid for EVA Rescue) उपकरणांची क्षमता तपासली. SAFER हे उपकरण अंतराळवीरांना स्थानकाशी संपर्क तुटल्यास सुरक्षितपणे परत येण्यासाठी मदत करते.
16 जानेवारीच्या स्पेसवॉकदरम्यान, सुनीता विल्यम्स यांनी महत्त्वाचे हार्डवेअर बदलले आणि Neutron Star Interior Composition Explorer (NICER) X-ray दुर्बिणीची दुरुस्ती केली. याशिवाय, त्यांनी हार्मनी मॉड्यूलवरील मार्गदर्शक परावर्तक बदलले, जो येणाऱ्या अंतराळयानांना योग्य दिशानिर्देश करण्यात उपयुक्त आहे.
US Spacewalk 91 या मोहिमेला सुनीता विल्यम्स यांच्यासाठी विशेष महत्त्व आहे. 12 वर्षांनंतर त्यांनी अंतराळ स्थानकाबाहेर काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी त्यांनी 8 यशस्वी स्पेसवॉक पूर्ण केले आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधून अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. मात्र, उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे स्पेसक्राफ्ट रिकामेच परत पाठवावे लागले.
सुनीता विल्यम्स यांची ही नवी मोहीम वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अंतराळ स्थानकाबाहेर सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याच्या या प्रयत्नांमुळे भविष्यातील अंतराळ संशोधनाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.