Suzuki E-Access : सुजुकीची इलेक्ट्रिक क्षेत्रात एन्ट्री! 'e-Access' लवकरच होणार लॉन्च, किंमत किती अन् खास फीचर्स? पाहा एका क्लिकवर

Suzuki E-Access launch date price features : सुजुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘e-Access’ चे उत्पादन सुरू केले आहे. ही स्कूटर आकर्षक डिझाईन, स्मार्ट फिचर्स आणि ९५ किमी रेंजसह लवकरच बाजारात येणार आहे.
Suzuki E-Access launch date price features
Suzuki E-Access launch date price featuresesakal
Updated on

Suzuki Electric Access Details : भारताच्या वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आता Suzuki Motorcycle India Pvt. Ltd. (SMIPL) या दिग्गज कंपनीनेही आपली ताकद दाखवली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 'e-Access' चे उत्पादन हरयाणातील गुरगाव येथील प्रकल्पातून सुरू केले असून यामुळे सुजुकीने भारतीय ई-वाहन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

ऑटो एक्स्पोमध्ये पहिली झलक


साल २०२५ च्या Auto Expo मध्ये ‘e-Access’ प्रथमच सादर झाली होती. तिच्या डिझाइन आणि तांत्रिक फीचर्समुळे स्कूटरने तेव्हा चांगलीच चर्चा मिळवली होती. मे २०२५ मध्ये या स्कूटरचे उत्पादन सुरू झाले असून पहिली युनिट उत्पादन रेषेवरून यशस्वीपणे बाहेर आली आहे.

पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञान


e-Access स्कूटर ही Suzuki e-Technology वर आधारित असून, यात Lithium Iron Phosphate (LFP) बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी जलरोधक, उच्च तापमान सहनशील आणि धक्क्यांपासून सुरक्षित आहे. यामुळे वापरकर्त्याला टिकाऊपणा आणि विश्वासार्हता याची हमी मिळते.

या स्कूटरमध्ये regenerative braking system, belt drive system यांसारखे आधुनिक फीचर्स आहेत. बेल्ट ड्राईव्ह सिस्टममुळे स्कूटर आरामात चालते आणि देखभाल कमी लागते.

Suzuki E-Access launch date price features
Jyoti Malhotra : अ‍ॅप वापरताना एक चूक अन् तुम्हालाही होऊ शकते जेल? ज्योती मल्होत्राने 'हे' 3 अ‍ॅप वापरुन पाकिस्तानला पुरवलेली माहिती

आकर्षक डिझाईन आणि स्मार्ट फिचर्स


e-Access चे डिझाईन पारंपरिक स्कूटर्सपेक्षा अधिक प्रीमियम आहे. ती स्लीक बॉडी, LED हेडलॅम्प्स, vertical DRL आणि टर्न इंडिकेटर्स सह येते. ड्युअल टोन रंग, कॉन्ट्रास्ट सीट कव्हर्स, आणि मोठा TFT डिस्प्ले ही त्याची खास फीचर्स आहेत.

या TFT डिस्प्लेमध्ये कनेक्टिव्हिटी फिचर्सही देण्यात आले आहेत. शिवाय, Suzuki Drive Mode Selector-e (SDMS-e) चा समावेश असून वापरकर्त्याला Eco Mode, Ride Mode A, Ride Mode B आणि Reverse Mode अशा विविध पर्यायांमधून निवड करता येते.

प्रभावी परफॉर्मन्स आणि सुरक्षितता


ही स्कूटर एका चार्जमध्ये सुमारे ९५ किलोमीटर पर्यंत रेंज देते. ४.१ किलोवॅट पॉवर आणि १५ एनएम टॉर्क सह ती ७१ किमी/तास इतकी टॉप स्पीड गाठते. यामध्ये १२ इंचांचे चाके आणि पुढील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, जे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

Suzuki E-Access launch date price features
Instagram Safety : हॅकर्स अन् स्पॅमपासून सुरक्षित राहायचंय? इंस्टाग्रामवरच्या 'या' 5 सेटिंग्स लगेच सुरू करा

जरी या स्कूटरच्या लाँचची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, तरी मार्केटमध्ये तिची मोठी उत्सुकता आहे. एकदा बाजारात आली की ही स्कूटर Ather Rizta, Ola S1, TVS iQube, Honda Activa e आणि Bajaj Chetak यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सना थेट टक्कर देईल.
सुजुकीने या स्कूटरच्या माध्यमातून केवळ इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये प्रवेश केला नसून भारतीय शहरांमध्ये पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि विश्वसनीय प्रवासाचा नवीन पर्याय देण्याचा निर्धार केला आहे. e-Access ही स्कूटर केवळ वाहन न राहता भारतीय वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात ठरेल असेच चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com