
Tata Curvv: आकर्षक डिझाईन अन् जबरदस्त फिचर्ससह येत आहे टाटाची बहुचर्चित कार
टाटा मोटर्सने (Tata Motors) आज भारतात आपल्या नवीन एसयूव्हीचे अनावरण केले आहे. टाटा कर्व्ह (Tata Curvv) असे या कारचे नाव असून ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. कंपनी टाटा कर्व्हला भविष्यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये देखील आणणार आहे.
टाटा मोटर्सने नवीन कर्व्हबद्दल अधिक तपशील जारी केलेले नाहीत. पण हे वाहन टाटाच्या नवीन अपग्रेड केलेल्या X1 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे टाटा कर्व्हची लांबी 4.3 मीटर असणे अपेक्षित आहे आणि ती जास्त व्हीलबेससह येईल.
हेही वाचा: Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत
रेंज काय असेल?
टाटा मोटर्सने नवीन वाहनाची किंमत आणि श्रेणी याबद्दल कोणताही तपशील शेअर केलेला नाही. तथापि, कंपनी Curvv EV SUV ची प्रमाणित श्रेणी 400-500km असण्याची अपेक्षा करत आहे. टाटा कर्व्ह पूर्णपणे नवीन डिझाइनसह येईल. कंपनीचा दावा आहे की Tata Curvv सारखे नवीन डिझाइन भविष्यातील Tata SUV मॉडेल्समध्ये दिसेल. पेट्रोल आणि डिझेलमध्ये लॉन्च केल्यानंतर, त्याची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos शी होईल.
हेही वाचा: ६० हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या तीन बाइक्स; देतात दमदार मायलेज
टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक SUV ला स्प्लिट LED हेडलॅम्प सेटअप सोबत बोनेटवर एलईडी लाईट्स आहेत. त्याचबरोबर समोरच्या बंपरमध्ये त्रिकोणाच्या आकाराचे एलईडी दिवेही देण्यात आले आहेत. कर्व्हवरील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बाह्य रिअरव्ह्यू मिरर (ORVMs) ऐवजी दिलेले मागील कॅमेरे. ज्यामुळे तिचा लुक टाटाच्या इतर कारपेक्षा वेगळा आहे.
Web Title: Tata Curvv Tatas Most Talked Car Comming Soon Attractive Design And Great Features
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..