Tata Motors: आली रे आली! जबरदस्त फिचर अन् स्पीडसह टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही कार तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Motors EV Exon

Tata Motors: आली रे आली! जबरदस्त फिचर अन् स्पीडसह टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही कार तयार

Tata Motors : भारतात नेक्‍सॉन ईव्‍ही लाँचच्‍या तीन वर्षांना साजरे करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज किंमत व सुधारित रेंजमधील परिवर्तनासह भारतातील पहिल्‍या क्रमांकाची ईव्‍ही नेक्‍सॉन ईव्‍ही पोर्टफोलिओच्‍या रिपोझिशनिंगची घोषणा केली.

टाटा मोटर्सने आकर्षक किंमतीसह नेक्‍सॉन ईव्‍ही पोर्टफोलिओला केले रिपोझिशन; मॅक्‍स व्‍हेरिएण्‍ट्सची रेंज ४५३ किमीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना स्‍मार्ट इं‍जीनिअरिंग व सुधारित स्‍थानिकीकरणामधून फायदे होणार आहेत. कारच्या अपडेटेड फिचरबाबत आणखी जाणून घेऊया.

ठळक वैशिष्‍ट्ये:

• नेक्‍सॉन ईव्‍ही श्रेणी आता १४.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक किंमतीपासून सुरूवात होण्‍यास रिपोझिशन झाली आहे.

• नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स श्रेणी पॅक केलेले नवीन वैशिष्‍ट्य नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम व्‍हेरिएण्‍टसह १६.४९ लाख रूपयांच्या किंमतीपासून सुरूवात होते.

• नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स प्रमाणित रेंज ४५३ किमीपर्यंत वाढवण्‍यात आली आहे, विद्यमान ग्राहकांना १५ फेब्रुवारी २०२३ पासून सॉफ्टवेअर अपडेटच्‍या माध्‍यमातून सुधारित रेंजचा लाभ मिळेल.

• माहितीनुसार ड्रायव्हिंग व वापर पद्धतींबाबतमध्ये नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स व्‍हेरिएण्‍ट्सची रेंज २५ जानेवारी २०२३ पासून ४५३* किमीपर्यंत (एमआयडीसी) वाढवण्‍यात आली आहे. रेंजमधील ही सुधारणा विद्यमान नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स मालकांना १५ फेब्रुवारी २०२३ पासून डीलरशिप्‍समध्‍ये सॉफ्टवेअर अपडेटच्‍या माध्‍यमातून ऑफर करण्‍यात येईल.

जबरदस्त फिचर

• कंपनीने आज पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम ट्रिम लाँच केली. १६.४९ लाख रूपये आकर्षक किंमत असलेल्‍या या व्‍हेरिएण्‍टमध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी®️)सह आय-व्‍हीबीएसी, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी डीआरएल व एलईडी टेल लॅम्‍प्‍स, पुश बटन स्‍टार्ट, डिजिटल टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, झेडकनेक्‍ट कनेक्‍टेड कार टेकसह स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी आणि रिअर डिस्‍क ब्रेक्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

• टॉप एण्‍ड ट्रिम नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सझेड+ लक्‍सची किंमत बदलून १८.४९ लाख रूपये करण्‍यात आली आहे. एक्‍सएमच्‍या वैशिष्‍ट्यांव्‍यतिरिक्‍त या व्‍हेरिएण्‍टमध्‍ये लेदरेट सीट्ससह वेंटिलेशन, वायरलेस स्‍मार्टफोन चार्जर, ऑटो डिमिंग आयआरव्‍हीएम, केबिन एअर प्‍युरिफायर, इलेक्ट्रिक सनरूफ, ८ स्‍पीकर्स असलेली हार्मनची १७.७८ सेमी फ्लोटिंग इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, १६-इंच अलॉई व्‍हील्‍स, हिल डिसेंट कंट्रोल, शार्कफिन अॅन्‍टेना इत्‍यादी वैशिष्‍ट्ये आहेत. (Tata Motors)

• नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइम एक्‍सएममध्‍ये प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स व एलईडी डीआरएल, पुश बटन स्‍टार्ट, डिजिटल टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, क्रूझ कंट्रोल, झेडकनेक्‍ट कनेक्‍टेड कार टेकसह स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी, हार्मन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या व्‍हेरिएण्‍टची किंमत आता १४.४९ लाख रूपये करण्‍यात आली आहे.

संपूर्ण नेक्‍सॉन ईव्‍ही लाइन-अपसाठी बुकिंग्‍जना त्‍वरित सुरूवात झाली आहे. नवीन व्‍हेरिएण्‍ट नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएमच्‍या डिलिव्‍हरीस एप्रिल २०२३ पासून सुरूवात होईल.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

नेक्‍सॉन ईव्‍ही पोर्टफोलिओमधील परिवर्तनाबाबत सांगताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ‘‘भारतातील पहिल्‍या क्रमांकाची ईव्‍ही नेक्‍सॉन ईव्‍हीने तिसरे यशस्‍वी वर्ष पूर्ण केले आहे. ४०,००० हून अधिक ग्राहकांना हे वेईकल आवडले आहे आणि त्‍यांनी या वेईकलवर विश्‍वास दाखवला आहे.

या वेईकलने ६०० दशलक्ष किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास केला आहे. याप्रसंगी आम्‍ही सर्वांना शाश्‍वत परिवहन उपलब्‍ध करून देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि हे रिपोझिशनिंग त्‍याच दिशेने मोठे पाऊल आहे.