

Tata Motor Prima 3540.K Launch
ESakal
टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने दक्षिण आशियामधील प्रमुख बांधकाम उपकरण प्रदर्शन एक्सकॉन २०२५ मध्ये प्रगत सोल्यूशन्सच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिआचे अनावरण केले. ज्यासह कंपनीचा देशातील झपाट्याने विस्तारित होत असलेल्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्राला पाठिंबा देण्याचा मनसुबा आहे. आपली थीम 'प्रॉडक्टिव्हीटी अनलीश'शी बांधील राहत कंपनीने ऑपरेशनल कार्यक्षमता व ताफ्याची लाभक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या हेवी-ड्युटी, भविष्यासाठी तयार वेईकल्सना लाँच केले आहे.