टाटा मोटर्सच्या वाहनांची जानेवारीत विक्रमी विक्री, या कार ठरल्या टॉपर | Tata Motors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tata motors registered highest ever monthly sales in january 2020 check tata punch and Nexon sale

टाटा मोटर्सच्या वाहनांची जानेवारीत विक्रमी विक्री, या कार ठरल्या टॉपर

टाटा मोटर्स (Tata Motors) ने नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदार पध्दतीने केली आहे, कंपनीने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मासिक विक्री नोंदवल्याची घोषणा केली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटारला मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या देशांतर्गत वाहनांच्या विक्रीत 26 टक्क्यांनी वाढ झाल्याचे टाटा मोटर्सने सांगितले आहे. टाटा मोटर्सने जानेवारी 2022 मध्ये एकूण 72,485 युनिट्स (पॅसेंजर आणि कमर्शिअल) गाड्या विकल्या आहेत हा आकडा जानेवारी 2021 मध्ये फक्त 57,649 युनिट्स इतकाच होता.

फक्त पॅसेंजर वाहनांबाबत बोलायचे झाल्यास त्यात कंपनीने आणखी मोठी झेप घेतली आहे. टाटा मोटर्सने या वर्षी जानेवारी महिन्यात पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. कंपनीने प्रवासी वाहनांच्या 40,777 युनिट्सची विक्री केली आहे, जी या सेगमेंटमधील टाटा मोटर्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 26,978 तर डिसेंबरमध्ये 35,299 गाड्यांची विक्री केली होती.

हेही वाचा: ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

पंच आणि नेक्सॉन

कंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा टाटा पंच (Tata Punch) आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon)चा आहे. या दोन्ही गाड्यांच्या विक्रीने मिळून 10,000 युनिट्सचा आकडा पार केला आहे. तसेच सीएनजीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी 2022 मध्ये 3,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. लाँचच्या पहिल्या महिन्यात Tiago आणि Tigor च्या एकूण विक्रीत CNG चा वाटा 42% होता. त्याच वेळी, पुण्यातील प्लांटने मार्च 2007 नंतर सर्वाधिक मासिक उत्पादन नोंदवले.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक वाहन विक्री जानेवारीमध्ये पाच पटीने वाढून 2,892 युनिट्सवर पोहोचली. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 514 इलेक्ट्रिक वाहने विकली, ज्यात Tata Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. अलीकडेच कंपनीने सांगितले होते की, Tata Nexon EV च्या एकूण विक्रीने 13,500 युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे आणि ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे.

हेही वाचा: वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

Web Title: Tata Motors Registered Highest Ever Monthly Sales In January 2020 Check Tata Punch And Nexon Sale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top