
Tata लॉंच करणार 'या' 4 इलेक्ट्रिक कार; काय असेल खास? वाचा
Tata Motors ने नुकतीच नवीन Curvv इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट कार सादर केली. यानंतर 2026 पर्यंत पोर्टफोलिओमध्ये 10 इलेक्ट्रिक वाहने आणण्याची कंपनीची योजना आहे. पुढील 2 वर्षात कंपनी 3-4 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करणार आहे. टाटा मोटर्सने सध्याच्या ICE मॉडेलवर आधारित 2023 पर्यंत 2 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आज आपण टाटाच्या 2024 पर्यंत लॉन्च होणार्या इलेक्ट्रिक वाहनांची माहिती जाणून घेणार आहोत.
TATA NEXON EV लाँग रेंज
Tata Motors नेक्सॉन EV चे लाँग रेंज व्हर्जन देशात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Tata Nexon EV च्या सध्याच्या मॉडेलला 30.2 kWh क्षमतेचा बॅटरी दिली आहे, जी एका चार्जवर 312 किमीची रेंज देते. मात्र, नवीन 2022 मॉडेल 40kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येऊ शकते, जे एका चार्जवर जवळपास 400 किमी अंतरापर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल. याशिवाय, टाटा मोठ्या बॅटरी पॅकमध्ये बसण्यासाठी या मॉडेलच्या सर्फेस आणि बूट स्पेसमध्ये बदल करू शकते. नवीन व्हर्जनमध्ये हवेशीर सीट, एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल आणि पार्क मोड सारखे फीचर्स मिळू शकतात.
TATA ALTROZ EV
टाटा मोटर्सने 2020 ऑटो एक्सपोमध्ये Altroz EV शोकेस केले होते . नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनीचे Ziptron तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. 250-300 किमी दरम्यानची रेंज मिळणे अपेक्षित आहे. कंपनी टॉप मॉडेलसाठी Ziptron तंत्रज्ञानाचा अपटेटेड व्हेरिएंट देखील वापरू शकते. कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV प्रमाणेच, Altroz EV ZConnect अॅपसह ऑफर केले जाऊ शकते, जे 35 कनेक्टेड कार फाचर्स देते.
हेही वाचा: तुरुंगात बंद आझम खान यांना ओवेसींच्या AIMIM कडून ऑफर, म्हणाले...
Tata Punch EV
टाटा मोटर्सने पंच मायक्रो SUV ची इलेक्ट्रिक आवृत्ती देखील विकसित करणे अपेक्षित आहे. ही 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल देशातील ब्रँडचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मॉडेल असेल. नवीन मॉडेलमध्ये नेक्सॉन ईव्ही प्रमाणेच Ziptron EV पॉवरट्रेन तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता आहे. मायक्रो SUV ला 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. Nexon EV एकाच चार्जवर 312km चालेल असा दावा केला जातोय.
हेही वाचा: "सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात 40 लाख भारतीयांचा मृत्यू"
TATA CURVV BASED EV
Tata Motors ने नुकतीच नवीन Curvv इलेक्ट्रिक SUV कॉन्सप्ट कार सादर केली. या एसयूव्हीचे उत्पादन 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. ही कार इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह सादर केली जाईल. हे जनरेशन 2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे मुळात टाटा च्या X1 प्लॅटफॉर्मची सुधारित आवृत्ती आहे. या एसयूव्हीची लांबी 4.3 मीटर असण्याची शक्यता आहे आणि ती अधिक लांब व्हीलबेससह येईल.
हेही वाचा: दिल्लीत 15 दिवसात कोरोना रुग्णसंखेत 500 टक्क्यांनी वाढ - रिपोर्ट
Web Title: Tata Motors To Launch 4 New Electric Cars Suvs In India By 2024 Nexon Altroz Punch And Curvv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..