‘टाटा नेऊ’ ॲप बाजारात दाखल

टाटा डिजिटलने उत्पादन व्यापार, सेवा व्यापार आणि आर्थिक सेवा एकत्रिकपणे ग्राहकांना उपलब्ध
Tata Neu app launched Tata Digital mumbai
Tata Neu app launched Tata Digital mumbaisakal

मुंबई : टाटा डिजिटलने उत्पादन व्यापार, सेवा व्यापार आणि आर्थिक सेवा एकत्रिकपणे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘टाटा नेऊ’ अॅप नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. फॅशनपासून फायनान्सपर्यंत, गॅजेट्सपासून वाणसामानापर्यंत, हॉटेल्सपासून आरोग्यापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून प्रवासापर्यंत सर्व बाबी ‘टाटा नेऊ’वर एकाच ठिकाणी मिळणार आहे.

तसेच या अॅपवर यूपीआय व्यवहार, बिलांचा भरणा, कर्ज आणि विम्यासहित अनेक आर्थिक सेवादेखील उपलब्ध आहे. ‘टाटा नेऊ’वर सध्या एअरएशिया, बिगबास्केट, क्रोमा, आयएचसीएल, क्युमिन, स्टारबक्स, टाटा १एमजी, टाटा क्लिक, टाटा प्ले, वेस्टसाइड यांच्यासह अनेक ब्रँड्सची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘टाटा नेऊ’ची सुविधा टाटा डिजिटलसोबतच अँड्रॉइड व आयओएस स्टोअरवरही उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com