Tata Satellite Launched : भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह अखेर लाँच; स्पेस-एक्सच्या मदतीने अमेरिकेतून झालं प्रक्षेपण

TSAT-1A हा भारतीय कंपनीने तयार केलेला पहिला खासगी हेरगिरी उपग्रह आहे.
Tata Satellite Launched
Tata Satellite LaunchedeSakal

SpaceX launches Tata Satellite : टाटा सन्सच्या टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेडने (TASL) एक खास हेरगिरी उपग्रह तयार केला होता. रविवारी (7 एप्रिल) या उपग्रहाचं यशस्वी लाँचिंग पार पडलं. फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरुन हे प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी स्पेस एक्सच्या फाल्कन-9 रॉकेटची मदत घेण्यात आली. हा उपग्रह टाटाने सॅटेलॉजिक या कंपनीसोबत मिळून तयार केला आहे.

TSAT-1A हा भारतीय कंपनीने तयार केलेला पहिला खासगी हेरगिरी उपग्रह आहे. या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं. टाटाच्या कर्नाटकमधील वेमंगल फॅसिलिटीमध्ये या सॅटेलाईटला असेम्बल करण्यात आलं होतं. हा उपग्रह हाय-रिझॉल्यूशन ऑप्टिकल सॅटेलाईट इमेजेस पुरवणार आहे. यामध्ये भरपूर कलेक्शन कपॅसिटी आणि लो-लेटन्सी हे दोन खास फीचर्स असणार आहेत. यामुळे पृथ्वीवरील अधिक अचूक, भरपूर आणि जलद डेटा मिळणं शक्य होणार आहे.

भारतीय सेनेला होणार फायदा

टाटाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आर्मी ही त्यांची प्रमुख कस्टमर असणार आहे. या उपग्रहाने दिलेली माहिती भारतीय सैन्याला भरपूर फायद्याची ठरणार आहे. विशेषतः सीमा भागामधील रिअल टाईम फोटो मिळवण्यासाठी हा उपग्रह कामी येईल. "आमचे प्रमुख कस्टमर हे सरकार, म्हणजेच सैन्य असणार आहेत. कमर्शिअल कस्टमर्सचा विचारही आम्ही भविष्यात करू" असं टाटाने सांगितलं आहे.

Tata Satellite Launched
Tesla Robotaxi : इलॉन मस्क ऑगस्टमध्ये लाँच करणार 'रोबोटॅक्सी', मात्र टेल्साच्या गाड्या खरंच विश्वासार्ह आहेत का?

इस्रोने यापूर्वी अशा प्रकारचे अनेक उपग्रह लाँच केले आहेत. मात्र, भारतातील खासगी क्षेत्रातील हा पहिलाच उपग्रह आहे. अगदी 50 किलोपेक्षा कमी वजनाचा हा उपग्रह 0.7 ते 0.8 मीटर रिझॉल्यूशन देऊ शकतो. हे सॉफ्टवेअरच्या मदतीने 0.5 ते 0.6 मीटरपर्यंत वाढवण्यात येईल. टाटाची स्पेस सेक्टरप्रति असलेली कमिटमेंट यातून दिसून येते. भारताच्या विविध सरकारी संस्थांनी यासाठी आमची भरपूर मदत केली; असंही कंपनीने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com