Tech Layoff 2024 : टेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; भारतीय कंपन्याही मागे नाही

Tech Industry : आर्थिक मंदी, ग्राहकांची बदलती मागणी, तंत्रज्ञानातील बदलाचा दिला हवाला
विविध टेक्नो कंपन्यांनी २,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
विविध टेक्नो कंपन्यांनी २,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.esakal

Technology : टेक उद्योगात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा सिलसिला अद्याप थांबलेला दिसत नाही. Layoffs.fyi च्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांत, विविध टेक्नो कंपन्यांनी २,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आर्थिक मंदी, ग्राहकांची बदलती मागणी, तंत्रज्ञानातील बदल आणि स्वयंचलितकरण यासारख्या कारणांचा कंपन्यांनी हवाला दिला आहे.

विविध टेक्नो कंपन्यांनी २,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
Japan Technology : जपानने घेतली 6G उपकरणाच्या प्रोटोटाईपची चाचणी; तब्बल 100 GBPS मिळतोय स्पीड.. संपूर्ण जग चकित!

विविध उद्योगांमधून वाढती कर्मचारी कपात ही आर्थिक परिस्थितीत होणारा बदल दर्शवित असून याचा दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात वित्त,(finance) आरोग्य (health) आणि तंत्रज्ञान (tech) क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याची नोंद आहे.

आत्तापर्यंत सर्वाधिक कर्मचारी कपात ही अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्हकेशन रेंटल मॅनेजमेंट कंपनी Vacasa ची झाली आहे. कंपनीने ८०० कर्मचाऱ्यांची, म्हणजेच त्यांच्या कार्यसंस्थेच्या १३ टक्के इतक्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने ही कर्मचारी कपात कंपनीचे पुनर्गठन करण्यासाठी केल्याचे सांगितले आहे.

दुसरी सर्वाधिक कर्मचारी कपात ही सॅन डिएगो येथील आरोग्य तंत्रज्ञान कंपनी Cue Health ची झाली आहे. या कंपनीने जवळपास २३० कर्मचाऱ्यांना, म्हणजेच त्यांच्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

भारतीय कंपन्यांनीही (Indian companies) या आठवड्यात कर्मचारी कपात केली आहे. Unacademy चा एक भाग असलेल्या PrepLadder ने त्यांच्या कार्यसंस्थेतील २५ टक्के कर्मचारी म्हणजेच १४५ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे, बेंगलोरच्या फिनटेक् कंपनी Simpl ने १०० कर्मचाऱ्यांची, म्हणजेच त्यांच्या कार्यसंस्थेच्या १५ टक्के इतक्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

विविध टेक्नो कंपन्यांनी २,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
Sci-tech : सर्वात स्वस्त QLED

कर्मचारी कपात करण्याची कारणे

जागतिक अर्थव्यवस्था अनेक उद्योगांमध्ये मंदीच्या झळांनी ग्रस्त आहे आणि यामुळेच व्यवसाय खर्च कमी करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. कर्मचारी संख्या कमी करणे हा जगभरातील व्यवसायांसाठी खर्च कमी करण्याचा एक मार्ग आहे.

कोविड महामारीनंतर ग्राहकांच्या बदलत्या निवडी हा देखील एक प्रमुख घटक आहे. कारण प्रवास (travel) आणि फिटनेस (fitness industry) उद्योगांमध्ये काही सेवा किंवा उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. याच कारणास्तव Vacasa सारख्या कंपन्या कर्मचारी कपात करीत आहेत.

याशिवाय, तंत्रज्ञान (technology) आणि स्वयंचलितकरण (automatization) क्षेत्रातील जलद गतीने होणारा विकास कंपन्यांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करीत आहे. यामुळे काही भूमिका अनावश्यक ठरल्याने त्यामुळे नोकरीच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे. हा ट्रेंड विशेषत: टेक्नो आणि वित्त क्षेत्रात जास्त प्रकर्षाने दिसून येतो, जिथे कंपन्या त्यांच्या मूलभूत क्षमता वाढवण्यासाठी आर्थिक पुनर्रचना करीत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून कमी आवश्यक असलेल्या विभागांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com