'गुगल टॉक' आता अधिकृतरित्या बंद! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

''हँगआऊट'मध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि 'गुगल'च्या इतर सेवांशी जोडून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सांघिक चर्चा आणि संवादासाठी आता 'हँगआऊट'सारखे अद्ययावत ऍप्लिकेशन उपलब्ध झाल्याने आता 'गुगल टॉक'चा निरोप घेण्याची वेळ आली आहे,

'गुगल टॉक' हे ऍप्लिकेशन आता अधिकृतरित्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय 'गुगल'ने काल (सोमवार) अंमलात आणला. यामुळे 'गुगल टॉक' (किंवा 'जी-चॅट') वापरणाऱ्यांना आता 'हँगआऊट'कडे वळावेच लागणार आहे. 

'जी-मेल'च्या युझर्सला एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा सोपा पर्याय म्हणून 2005 मध्ये 'गुगल'ने हे ऍप्लिकेशन तयार केले होते. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये 'गुगल'ने 'हँगआऊट' सुरू केले. त्यानंतर 'जी-मेल'च्या अनेक युझर्सने 'गुगल टॉक'ऐवजी 'हँगआऊट' वापरण्यास सुरवातही केली होती. तरीही, 'गुगल टॉक' वापरण्याचा पर्याय कालपर्यंत उपलब्ध होता. 

''हँगआऊट'मध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि 'गुगल'च्या इतर सेवांशी जोडून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सांघिक चर्चा आणि संवादासाठी आता 'हँगआऊट'सारखे अद्ययावत ऍप्लिकेशन उपलब्ध झाल्याने आता 'गुगल टॉक'चा निरोप घेण्याची वेळ आली आहे,' असे 'गुगल'ने मार्चमध्ये प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते. 

'हँगआऊट मीट' आणि 'हँगआऊट चॅट' या माध्यमातून व्यावसायिक युझर्सनाही जोडून घेण्याचा 'गुगल'चा प्रयत्न आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technology news Google G Talk Google Hangout Sundar Pichai