स्मार्टफोन बदलणार? स्मार्टफोन किती काळ टिकतो, घ्या जाणून

Life Span Of Smartphone News
Life Span Of Smartphone News

औरंगाबाद : तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन कितीही महाग असला तरी तो किती वर्ष टिकू शकतो. या विषयी तुम्हाला माहिती आहे का? आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक वर्षी स्मार्टफोन बदलणे योग्य की अयोग्य याविषयी सांगणार आहोत. तुमच्या पैकी असे अनेक जण असतील जे की एका वर्षाच्या आत फोन बदलतात. बाजारातील अपडेटेड व्हर्जन हे एक या मागील कारण असू शकते. दुसरीकडे काहींचा शौकही असू शकतो. मात्र असेही काही लोक असतील जे की एकदा फोन घेतल्यानंतर दोन ते तीन वर्षे त्याचा वापर करतात. या सर्व परिस्थितीत प्रत्येक वर्षी मोबाईल बदलणे गरजेचे असते का? तत्पूर्वी हे जाणून घेऊ या की एका स्मार्टफोनची आयुमर्यादा (किती वर्ष टिकतो) किती असते?

मोबाईलची आयुमर्यादा
- तज्ज्ञांच्या मतानुसार कोणत्याही कंपनीच्या एका स्मार्टफोनची आयुमर्यादा भारतात नऊ महिन्यांची असते. मात्र पारंपरिक पद्धतीनुसार ती १८ महिन्यांचीच  असते. सर्वप्रथम शाओमीचा विचार करु. तिची आयुमर्यादा नऊच महिने असते. आम्ही असे का म्हणतो कारण नेहमी नोट सीरिजचे नवीन व्हेरिएंटला फार कमी कालावधीत ग्राहकांच्या भेटीला येतात. अशा स्थितीत लोक अद्ययावत झालेले फोन खरेदीला प्राधान्य देतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार स्मार्टफोनच्या बाजारात वर्षभर काम चालत असे. मात्र बाजारात तीव्र स्पर्धा सुरु झाल्याने फोनची आयुमर्यादा कमी करण्यात आले आहे. दुसरीकडे मायक्रोमॅक्ससह इतर ओईएमविषयी बोलाल तर सॅमसंगला टक्कर देण्यासाठी सर्वांनी एका वर्षांत लवकर आपापले फोन बाजारात आणण्यास सुरुवात केले. या कंपन्यांनुसार या प्रकारे कंपन्या जास्त महसूल निर्मिती करु शकतात.

स्मार्टफोन कंपन्यांचा उद्देश काय?
कोणत्याही स्मार्टफोनचे शेल्फ लाईफ जर नऊ महिने किंवा एका वर्षाचे असते. तर कंपन्यांसाठी ते किती फायद्याचे ठरते हेही जाणून घेऊ या. तंत्रज्ञान कंपन्यांना माहिती आहे की काही फीचर्स अपडेट करुन नवीन फोन बाजारात आणल्यास ग्राहक तो जरुर खरेदी करु इच्छितात. कंपन्यांच्या टाईमलाईनवर बारकाईने पाहिल्यास जेव्हा त्या फोन बाजारात आणतात तेव्हा काही दिवसानंतर त्यात अपग्रेड माॅडलवर  काम सुरु करतात. पुन्हा जुन्या माॅडल्सला दोन  ते तीन वर्षानंतर साॅफ्टवेअर अपडेट मिळणे बंद करतात. जेव्हा युजरला फोनमध्ये अपग्रेड मिळणे बंद होऊन जाते तेव्हा त्याला नवीन ब्रँड फोन खरेदी करावा लागतो.

प्रत्येक वर्षी फोन बदलणे योग्य आहे का?
तज्ज्ञांनुसार जर तुम्हाला एखादे स्मार्टफोन प्रत्येक वर्षी बदलावे लागत असेल तर त्याला चांगला स्मार्टफोन म्हणता येणार नाही. एखाद्या फोनचे कमीत-कमी आयुमर्यादा दोन वर्ष असेल तर त्याला चांगला फोन म्हटले जाते. प्रत्येक वर्षी नवीन फोन खरेदी करणे. हे तुमच्या आर्थिक नियोजन बिघडवू शकते. मात्र कोणतेही नवीन स्मार्टफोन इतकेही अपग्रेड केले जात नाही ज्यासाठी पैसे जास्त मोजावे लागतील.

शौक आणि गरज यातील फरक समजा
फोन बदलणे आणि शौक यामध्ये काय फरक हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवीन फोन घेणे वाईट आहे असे आम्ही म्हणत नाही. मात्र तुमचा फोन व्यवस्थित चालू आहे. यात तो बदलणे योग्य नाही. पण तुमचा फोन जुना होत चालला आहे. तर तुम्ही तो बदलू शकता.       

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com