
अनेक वेळा असे होते की आपल्याला विशिष्ट वेळेला एक संदेश पाठवायचा असतो. परंतु आपल्या कामाच्या व्यापात ते आपण विसरून जातो.
कोल्हापूर :व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही जर क्लाऊड मेसेजिंग ॲप टेलिग्राम वर सुरू केला असाल तर तुम्हाला एक अत्यंत फायदेशीर माहिती आज माहीती तुम्हाला आज सांगणार आहोत. टेलिग्राम फिचर च्या माध्यमातून तुम्ही सहजपणे मेसेज चे शेड्युल बनवू शकता.
आज कालच्या व्यस्त जीवनात आपण अनेक गोष्टी विसरून जातो. अनेक वेळा असे होते की आपल्याला विशिष्ट वेळेला एक संदेश पाठवायचा असतो. परंतु आपल्या कामाच्या व्यापात ते आपण विसरून जातो. तेव्हा असे वाटते की खरंच अशी जर सुविधा असती कि तयार केलेला मेसेज विशिष्ट वेळेत आपोआप जावा तर किती छान झाले असते. आज आम्ही तुम्हाला क्लाऊड बेस्ट मेसेजिंग ॲप टेलिग्राम च्या माध्यमातून सहजपणे आपल्या निर्धारित वेळेत तो संदेश दुसऱ्याला कसे जाईल याबाबत माहिती देणार आहोत.
हेही वाचा- इंस्टाग्रामवरील डिलीत झालेले पोस्ट आणि व्हिडिओ परत मिळवायचे आहेत ; करा या फिचरचा उपयोग -
ही सुविधा फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप मध्ये अद्यापही उपलब्ध झालेले नाही. जर तुम्ही व्हाट्सअप च्या माध्यमातून टेलिग्राम स्विच केला असेल आणि मेसेज चे शेड्युल करण्याचे पर्याय शोधत असाल तर खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही ही सुविधा सुरू करू शकता.
1) सुरुवातीस आपल्या स्मार्टफोनमधील टेलिग्राम ॲप ओपन करा.
2) चॅट ओपन करा ज्या माध्यमातून तुम्ही मेसेज शेड्युल करा
3) जो मेसेज पाठवणार आहात तो टाईप करून घ्या त्यानंतर सेंड मेसेज बटन दाबून ठेवा.
4) हे बटन बराच वेळ दाबून ठेवा.
5) थोड्या वेळानंतर सेंड बटन प्रेस करून धरला की तुम्हाला मेसेज शेड्युल आणि विदाऊट साऊंड असे दोन ऑप्शन दिसू लागतील.
6) तुम्ही मेसेज ऑप्शन टॅप करा तेव्हा तुम्हाला तारीख आणि वेळ निवडण्यास सांगेल.
7)तारीख आणि वेळ निवडल्यानंतर तुमचा मेसेज शेड्युल होईल आणि निर्धारित वेळेत तो पाठवला जाईल.
अशा पद्धतीने हवा तो मेसेज तुम्ही निर्धारित वेळेत पाठवू शकाल आणि हे मेसेज तुम्ही कोणत्याही वेळेस टाईप करून ठेवू शकता. त्यामुळे त्याच वेळेस उपलब्ध असले गरजेचे राहणार नाही.