
व्हॉटसअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत.
नवी दिल्ली - Whatsapp युजर्सना नव्या अटी आणि नियम स्वीकारण्यासाठी सध्या एक पॉप अप नोटिफिकेशन येत आहे. हे स्वीकारलं नाही तर सध्या नॉट नाउ असा पर्याय दिला आहे. मात्र फेब्रुवारीनंतर हा पर्याय नसेल. युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला असून जर त्यांनी नोटिफिकेशन स्वीकारलं नाही तर व्हॉटसअॅप वापरता येणार नाही. नव्या पॉलिसीनुसार व्हॉटसअॅप युजर्सचा डेटा आधीपेक्षा जास्त वापरू शकणार आहे आणि फेसबुक त्यांच्या इतर कंपन्यांसोबत तो शेअर करू शकणार आहे.
व्हॉटसअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत युजर्सचे म्हणणे आहे की, त्यांच्यासाठी प्रायव्हसी महत्त्वाची आहे. मग व्हॉटसअॅप वापरणं बंद करावं लागलं तरी चालेल.
सिग्नल अॅपने गुरुवारी ट्विटरवरून सांगितलं की, नव्या युजर्सची संख्या वाढल्यानं व्हेरिफिकेशन कोड येण्यास उशिर होत आहे. कंपनीने एक गाइडसुद्धा शेअऱ केलं आहे. त्यात युजर कशापद्धतीने मेसेंजरच्या ग्रुपला सिग्नल ग्रुपमध्ये अॅड करू शकतात ते सांगितलं आहे.
हे वाचा - USE Signal; जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं सांगितला WhatsApp ला पर्याय
विशेष म्हणजे युजरला त्यांचे चॅट एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये मूव्ह करता येत नाही. सिग्नलने जे फिचर शेअर केलं आहे ते फक्त युजरला एका मेसेजंरमधून दुसऱ्या मेसेंजरमध्ये घेऊन जातं.
इतर ग्रुपच्या चॅटला सिग्नलमध्ये कसं घेतलं जातं हेसुद्धा सांगण्यात आळं आहे. यामध्ये तुम्हाला आधी सिग्नल वर एक ग्रुप क्रिएट करावा लागेल. यामध्ये ग्रुप सेटिंग असून त्यात ग्रुप लिंकवर क्लिक करा. ग्रुप लिंकसाठी टॉगल ऑन करून शेअर वर क्लिक केल्यानंतर त्याला तुमच्या जुन्या मेसेंजर अॅपमध्ये शेअर करा.
हे वाचा - डोन्ट वरी, आता WhatsApp मधल्या तुमच्या विशिष्ट खाजगी चॅटला असे लावा लॉक
सिग्नल अॅपने ग्रुप मायग्रेशन लिंकसाठी सुरक्षेबाबत सांगताना म्हटलं की, लिंक्स ऑप्शनल असून त्या कधीही रोटेट किंवा डिसेबल करता येतात. नव्या मेंबरला जॉईन होण्याआधी ग्रुप अॅडमिनची परवानगी लागेल.
ग्रुप तयार केल्यानंतर नवीन ऑप्शन Enable होतील. यामध्ये शेअर आयकॉनवर टॅप करून लिंक इतर युजर्सना फॉरवर्ड करता येणार आहे. शेअर लिंकचा वापर करून ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सना अॅप्रुव्ह करण्यासाठी टॉगल ऑन किंवा ऑफ करता येतं. जर युजरला वाटलं की लिंक खूप शेअऱ झाली आहे तर त्या लिंकला रिसेटही करता येतं.