जोडीदारासाठी बना सिक्रेट सांता, गिफ्ट द्या 'हे' हटके गॅजेट्स; पाहा लिस्ट | Christmas Gifts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gift

Christmas Gifts: जोडीदारासाठी बना सिक्रेट सांता, गिफ्ट द्या 'हे' हटके गॅजेट्स; पाहा लिस्ट

Most Popular Christmas Gifts 2022: ख्रिसमस आणि नववर्ष आलं की गिफ्टची देखील चर्चा सुरू होते. मित्र-मैत्रिणी, जोडीदाराला ख्रिसमसच्या निमित्ताने काय गिफ्ट द्यावे, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर गॅजेट्स चांगले पर्याय ठरू शकतात. ई-कॉमर्स साइट्सवर कमी किंमतीत येणारे अनेक चांगले गॅजेट्स उपलब्ध आहेत. या गॅजेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

GIVA 925 Sterling Silver Rose Gold Bold Bangle Bracelet

GIVA 925 Sterling Silver Rose Gold Bold Bangle Bracelet

GIVA 925 Sterling Silver Rose Gold Bold Bangle Bracelet

ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही जोडीदाराला ब्रेसलेट गिफ्ट देऊ शकता. ई-कॉमर्स साइट्सवर खूपच कमी किंमतीत येणारे GIVA 925 Sterling Silver Rose Gold Bold Bangle Bracelet स्वस्तात उपलब्ध आहेत. आकर्षक डिझाइनसह येणाऱ्या या ब्रेसलेटला तुम्ही ४,७४९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

Luck Lab Dinner and A Movie Decider Dice

जोडीदाराला काहीतरी हटके गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर Luck Lab Dinner and A Movie Decider Dice एक चांगला पर्याय आहे. हे हटके Dice अर्थात फाशांद्वारे तुम्ही कोणता चित्रपट पाहायचा अथवा कोणत्या ठिकाणी जेवायला जायचे हे ठरवू शकता. २,८७७ रुपयांचे Luck Lab Dinner and A Movie Decider Dice गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे.

AYSIS Multipurpose 5 Pack Sneaker Containers Bins

तुमच्या जोडीदाराला नवनवीन ब्रँडेड बुट खरेदी करायची आवड असल्यास AYSIS Multipurpose 5 Pack Sneaker Containers Bins गिफ्ट देऊ शकतात. अनेकांना ब्रँडेड बुट कलेक्ट करायची आवड असते. अशांसाठी हे गिफ्ट्स नक्कीच चांगले आहे. या बॉक्समध्ये तुम्ही बुट व्यवस्थित ठेवू शकता. AYSIS Multipurpose 5 Pack Sneaker Containers Bins ची किंमत ५,६७४ रुपये आहे.

हेही वाचा: FIFA World Cup मध्ये Google चाही 'गोल', २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं...

New bee Headphone Stand

New bee Headphone Stand

New bee Headphone Stand

तुमच्या जोडीदाराला गाणी ऐकण्याची आवड असल्यास यासारखे परफेक्ट गिफ्ट कोणते असूच शकत नाही. या स्टँडमुळे योग्य ठिकाणी हेडफोन ठेवण्यास मदत होईल. या स्टँडमध्ये Aluminum headset mount आणि TPU rubber चा वापर करण्यात आला आहे. स्टँडमुळे तुमचे हेडफोन्स सुरक्षित राहतील. New bee Headphone Stand ची किंमत ३,०९८ रुपये आहे.

Arlega Beard Kit for Men Grooming & Care

ख्रिसमसच्या निमित्ताने जोडीदारासाठी खास गिफ्ट शोधताय? Arlega beard kit गिफ्ट म्हणून एक चांगला पर्याय आहे. खासकरून पुरुषांना तुम्ही हे किट गिफ्ट देऊ शकता. या प्रोडक्ट्सची किंमत ७,७३६ रुपये आहे.

Echo dot Smart speaker with Alexa

गॅजेट्स गिफ्ट द्यायचे असल्यास Echo dot Smart speaker with Alexa चा तुम्ही विचार करू शकता. ४,४९९ रुपये किंमतीत येणारा हा स्मार्ट स्पीकर खूपच जबरदस्त फीचर्ससह येतो. हे स्पीकर ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.

Fastrack Reflex VOX

नववर्षाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, जोडीदाराला स्मार्टवॉच गिफ्ट देऊ शकता. अनेकजण नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉच खरेदी करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे Fastrack Reflex VOX नक्कीच चांगला पर्याय आहे. शानदार हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या Fastrack Reflex VOX ची किंमत २,९९५ रुपये आहे.

हेही वाचा: Laptop Offer: जबरदस्त! महागडा लॅपटॉप मिळतोय अवघ्या १० हजारात, ऑफर-किंमत एकदा पाहाच