आता घरबसल्या मिळवा High Security Number Plate!

घरबसल्या मिळवा हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट! 'या' कंपनीने सुरू केली सुविधा
हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट
हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेटesakal
Summary

भारतात 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असणे अनिवार्य झाले आहे.

भारतात 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट (High security number plate) असणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही कोणताही वेळ न घालवता घरी बसून ऑनलाइन माध्यमातून हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट मिळवू शकता. ते आणखी सुलभ आणि सोपे बनवण्यासाठी, कार अँड बाईक सर्व्हिस एग्रीगेटर रास्ता ऑटोटेकने (Car and Bike Service Aggregator Rasta Autotech) BookmyHSRP सोबत करार केला आहे, जो सुरुवातीला दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) वितरण सेवांचा समावेश करेल. हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे ते जाणून घ्या. (The high security number plate of the vehicle has been made compulsory)

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट
रिलायन्स Jio चे सर्वांत स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत बंपर डेटा

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?

वाहनाची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट तयार करण्यात आली आहे. प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर (HSRP Hologram Sticker) आहे, ज्यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला आहे. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारचा पिन असेल जो तुमच्या वाहनाला जोडेल. एकदा या पिनने तुमच्या वाहनातील प्लेट पकडली की, ती दोन्ही बाजूंनी बंद होईल आणि एकाही बाजूने उघडणार नाही.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट का आवश्‍यक आहे?

परिवहन मंत्रालयाने (Ministry of Transport) 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक केले होते, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत, चलन येतच राहतात. नियम मोडल्यास परिवहन विभाग फिटनेस, नोंदणी नूतनीकरण आणि परमिटवर बंदी घालू शकतो. त्यामुळे 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन ऑर्डर कशी करावी?

तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल, iOS ऍप स्टोअर किंवा Android वापरकर्ता असाल तर तुम्हाला हाय सिक्‍युरिटी नंबरची नोंदणी करायची असल्यास Google Play Store वरून BookmyHSRP ऍप डाउनलोड करा. या ऍपद्वारे तुम्ही नवीन नंबर प्लेटची नोंदणी, रिअल टाइम शिपमेंट ट्रॅक, ऑर्डर रद्द करणे, परतावा आदी पर्याय निवडू शकता.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट
ब्रिटनहून अमेरिकेला गेलेले ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान Corona Positive

रास्ता ऑटोटेकने केला BookmyHSRP शी करार

रास्ता ऑटोटेकचे संस्थापक आणि एमडी कर्ण नागपाल म्हणाले, आम्हाला HSRP सोबतची आमची भागीदारी जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांसाठी नंबर प्लेट नोंदणीची प्रक्रिया आमच्या कंपनीसाठी आणखी सुलभ होईल. तर HSRP चे मुकेश मल्होत्रा म्हणाले, आम्ही रास्ता ऑटोटेकसोबत दीर्घ आणि मजबूत भागीदारीची अपेक्षा करतो.

साय-टेक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com