esakal | तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि टॉप मायलेज देणाऱ्या 'या' आहेत तीन बाईक्स; जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि टॉप मायलेज देणाऱ्या 'या' आहेत तीन बाईक्स; जाणून घ्या

तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि टॉप मायलेज देणाऱ्या 'या' आहेत तीन बाईक्स; जाणून घ्या

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद : सध्या पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामूळे बरेच जण आता दुचाकीचा नाद कमीच करत आहेत. पण ज्यांना कामानिमित्त रोज बाहेर पडावे लागते त्यांनी चांगल्या मायलेजच्या दुचाकी घेतल्या पाहिजेत. ग्राहकांच्या या गरजा पाहूनच काही कंपन्या सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीच्या दुचाकी तयार करत आहेत. तसेच त्यांचा मायलेजही चांगला असेल. चला तर मग देशातील टॉप ३ दुचाकींबद्दल जाणून घेऊया ज्यांचा मायलेज उत्तम असेल.

हेही वाचा: कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप

1. Bajaj Platina:

बजाज कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी दुचाकीमधील ही एक आहे. नोकदारवर्ग या गाडीला मोठी पसंदी देताना दिसतात. या बायकमध्ये १०२ सीसीचे इंजिन दिले आहे जे ८ बीएचपी पावर आणि ८ एनएम टॉर्क जनरेट करू शकते ज्यात ४ स्पीड ट्रांसमिशन आहेत. मायलेजच्या बाबतीत कंपनीचा दावा आहे की, बजाज प्लॅटीना ९० ते १०० किलोमिटर प्रति लिटर धावते.

2. Bajaj CT 100-

बजाजची ही दुचाकीही सर्वात जास्त विक्री होणारी आहे. ही गाडी वजनाने हलकी आणि टिकाऊ असल्याने ग्राहक याला मोठी पसंदी देताना दिसतात. या दुचाकीत ४ स्ट्रोकचा १०२ सीसीचे इंजिन दिले आहे जे ७.५ पीएस पावर आणि ८.३४ एनएम चा टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीच्या मते ही गाडी एका लिटरमध्ये १०० किलोमिटर धावते. या गाडीच्या किंमती ५५ हजारांपासून सुरू होतात.

हेही वाचा: दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

3. Hero HF100:

ही दुचाकी हीरो एचएफ डिलक्सचा अपग्रेडेड मॉडेल आहे. याच्या नवीन लुकला ग्राहकांची बरीच पसंती दिसत आहे. कंपनीने या दुचाकीला ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे जे ८.३६ पीएस पावर आणि ८.३६ टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते ही दुचाकी ७० किलोमिटरचा मायलेज देते. याची किंमत ५१ हजारांपासून सुरू होतात.

loading image