esakal | दुर्दैवी! मोबाईलचं वेड बेतलं जीवावर; आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः जेवन करताना मोबाईल न वापरण्याची तंबी दिल्यामुळे चिडलेल्या १५ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मानकापुरातील गोधनी परीसरात घडली. संस्कृता चंद्रशेखर सिंग असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर सिंग हे रेल्वे विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा आणि संस्कृता अशी दोन अपत्य आहेत. संस्कृता ही नववीत असल्यामुळे तिच्या वडिलांनी ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल घेऊन दिला. गेल्या वर्षभरापासून ती ऑनलाईन क्लासेस करीत होती. परंतु गतमहिन्यात नववीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना सरसरक पास करण्यात आल्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला. तेव्हापासून तिला मोबाईल वापरण्यावर निर्बंध घालण्यात येत होते. परंतु तिला तोपर्यंत मोबाईलचे वेड लागले होते.

चार तास ऑनलाईन क्लासेस झाल्यानंतर संस्कृताला व्हॉट्‍सॲप, फेसबूक, ट्‍वीटर, इंस्टाग्राम आणि सोशल मिडियावर वावरण्याची सवय लागली. त्यामुळे ती नेहमी मोबाईल घेऊनच राहत होती. तिचा बराच वेळ मोबाईलवर जात होता. त्यामुळे आईने तिला दोन ते तिनदा हटकले. त्यावर ती आईवरच चिडचिड करायची. २४ एप्रिलच्या दुपारी तीन वाजता ती मोबाईलवर खेळत होती. दरम्यान तिच्या आईने तिचा मोबाईल हिसकला आणि जेवन करण्यास सांगितले. त्यामुळे संस्कृता चिडली. आई वारंवार मोबाईलमुळे रागावत असल्याचा राग तिच्या मनात होता. त्यामुळे ती वरच्या माळ्यावर गेली आणि ओढनीने सिलिंग फॅनला गळफास घेतला.

हेही वाचा: 'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

दरम्यान तिच्या आईला मुलीच्या वागण्यावर संशय आला. ती काही वेळातच तिच्या मागे गेली. बेडरूममध्ये जाताच संस्कृता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने आईने मोठ्‍याने हंबरडा फोडला. घरातील सर्वांनी बेडरूमकडे धाव घेतली. बेशुद्धावस्थेत संस्कृताला रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संस्कृताचा २९ एप्रिलला सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लॉकडाउनमुळे मुलांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे मोबाईलच आता एकमेव जीवाभावाचा सोबती आहे. त्यामुळे ते मोबाईलवर वेळ घालवितात. मुलांना नाही ऐकण्याची सवय पालकांनी लावली नाही. त्यामुळे मुले जिद्दी बनतात. मुलांची कोणतीही मागणी पालक लगेच पूर्ण करतात, त्यांचे लाड आणि हट्ट पुरविल्या जातात. त्यामुळे त्यांच्यात सहनशिलता राहत नाही. मुलांमधील संयम हरवत चालला आहे. पालक मुलांसमोर झुकत आहेत. त्यांच्या विरोधात वागल्यास त्यांना राग येतो, त्या रागाची तिव्रता खूप असते. त्यामुळे ते कोणतेही पाऊल उचलू शकतात.
प्रा. राजा आकाश (मानसोपचार तज्ञ)

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top