
Best Cars: भारतात जेवढी विक्री नव्या कारची होते तेवढीच जुन्या कारचीदेखील मोठ्या प्रमाणात होते. भारतात सेंकेंड हँड मार्केट फार मोठं आहे. ज्या लोकांचा कार घेण्याचा बजेट कमी असतो असे लोक सेकेंड हँड कार विकत घेतात. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या सेकेंड हँड कारची आकडेवारी पुढे आली. चला तर त्याबाबात सविस्तर जाणून घेऊया.
TOI च्या एका रिपोर्टनुसार, फायनांशियल इयर 2O22 मध्ये सेकेंड हँड गाड्यांचं मार्केट परत एकदा कोरोनाच्या आधी ज्या पोजिशनमध्ये होतं त्याच पोजिशनमध्ये पोहोचलं. प्री-ओन्ड कार बाजार 2O22 मध्ये 4.1 मिलीयन युनिट ते 2027 पर्यंत 8.2 मीलियन युनिट म्हणजे दुप्पट होण्यची शक्यता वर्तवली गेली आहे.
बाजारात या कारची डिमांड सगळ्यात जास्त
FY22 मध्ये, 49% च्या बाजारपेठेतील युटिलिटी वाहनांनी छोट्या कार (45%) आणि सेडान (3%) ला मागे टाकले. याच कालावधीत, मोठ्या (8% ते 3%) आणि लहान (65% ते 45%) कारच्या वार्षिक विक्रीत घट झाली आहे.
OLX प्लॅटफॉर्म डेटानुसार प्री-ओन्ड कार सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय UV हे Hyundai Creta, Maruti Brezza, Maruti Ertiga आणि Mahindra XUV500 आहेत. मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट i20, रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 या प्री-ओन्ड सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय लहान कार आहेत ज्या सरासरी पाच वर्षांच्या वर टिकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.