
Tiago, Tigor, Safari : स्वस्तात खरेदी करा टाटा कार्स, 65000 पर्यंत सूट
Tiago, Tigor, Safari : टाटा मोटर्स त्यांच्या हॅरियर, सफारी, अल्ट्रोझ, टियागो आणि टिगोर सारख्या काही मॉडेल्सवर 65,000 पर्यंतचं मोठं डिस्काउंट देत आहे. टाटा MY2022 च्या न विकलेल्या मॉडेल्सवरही हे डिस्काउंट सुरू आहे. मात्र टाटाच्या नेक्सॉन, पंच किंवा त्याच्या EV रेंजमध्ये कोणतंही डिस्काउंट नाही.
Tata Safari : Tata च्या रेंज-टॉपिंग SUV असलेल्या 2023 मॉडेलच्या सर्व प्रकारांवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देणं सुरू आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांचं एक्सचेंज डिस्काउंट देखील समाविष्ट आहे. न विकल्या गेलेल्या MY2022 सफारीसाठी, टाटा मोटर्स सर्व उपलब्ध प्रकारांमध्ये एकूण 65,000 पर्यंत डिस्काउंट देत आहे.
Tata Harrier : Safari प्रमाणे MY2023 Harrier ला देखील मार्चमध्ये 35,000 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. यात 10,000 ची रोख सवलत आणि रु. 25,000 चे एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे. दुसरीकडे, MY2022 Harrier च्या न विकल्या गेलेल्या स्टॉकवर उपलब्ध प्रकारानुसार 65,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
Tata Tigor : Tata च्या MY2023 साठी, कंपनी या महिन्यात Tigor च्या पेट्रोल व्हर्जनवर 25,000 आणि Tigor CNG वर 30,000 ची सूट देत आहे. यावेळी, टिगोर सीएनजीचा गेल्या वर्षीचा न विकला गेलेला स्टॉक 40,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो, तर पेट्रोल व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Tata Tiago : Tiago हॅचबॅकच्या CNG व्हेरिएंटवर 30,000 रुपये आणि पेट्रोल व्हेरिएंटवर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे. MY2022 स्टॉकमध्ये इंटरेस्ट असलेले ग्राहक CNG आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात.
Tata Altroz : Tata ची प्रीमियम हॅचबॅक त्याच्या सर्व पेट्रोल आणि डिझेल प्रकारांवर अनुक्रमे 25,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केली जाऊ शकते. त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 25,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. Altroz च्या MY2022 स्टॉक मधील सर्व पेट्रोल आणि डिझेल प्रकारांवर अनुक्रमे 20,000 आणि 35,000 ची सवलत देण्यात येत आहे. MY2022 DCA पेट्रोल ऑटोमॅटिक Altroz वर 30,000 रुपयांची सूट मिळत आहे