तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते होईल रिकामे, सुरक्षेसाठी फॉलो करा 'या' टिप्स | Cyber Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Fraud

Cyber Fraud: तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते होईल रिकामे, सुरक्षेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

Cyber Fraud Tips: स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कोणालाही सहज पैसे पाठवणे शक्य आहे. टेक्नोलॉजीमुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. मात्र, याच टेक्नोलॉजीच्या मदतीने सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळते. यूपीआय पेमेंट, कार्ड पेमेंट, मोबाइल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार सोपे तर झाले. परंतु, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. ऑनलाइन व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा

अनेकदा आपण मेट्रो, रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर उपलब्ध असलेले फ्री वाय-फाय वापरतो. मात्र, यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाय-फाय वापरून ऑनलाइन व्यवहार करत असाल तर बँकेशी संबंधित माहिती चोरी होऊ शकते. याशिवाय, ऑनलाइन बँकिंगसाठी सार्वजनिक कॉम्प्युटरचा देखील वापर करू नये.

ओटीपी शेअर करू नका

ऑनलाइन पेमेंट करताना मोबाइलवर ओटीपी येत असतो. या ओटीपीनंतरच पेमेंट करणे शक्य होते. मात्र, अनेकजण हा ओटीपी इतरांना शेअर करतात. इतरांना ओटीपी शेअर केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

हेही वाचा: Smartphone Offer: एकच नंबर! २० हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय Samsung चा स्मार्टफोन, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

बनावट लिंकवर क्लिक करू नका

सायबर गुन्हेगार बँकिंग फ्रॉडसाठी ईमेल आणि लिंक पाठवत असतात. पैशांचे आमिष दाखवून या लिंक्सवर क्लिक करण्यास सांगितले जाते. मात्र, अशा लिंक्सवर क्लिक केल्यास तुमची खासगी माहिती चोरी होऊ शकते. या माहितीचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.

बँकिंग माहिती शेअर करू नका

ऑनलाइन बँकिंगशी संबंधित ओटीपी, पासवर्ड अथवा यूजरनेम कोणाशीही शेअर करू नये. यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

बनावट अ‍ॅप डाउनलोड करू नका

कोणत्याही अ‍ॅपला डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. प्ले स्टोरवर त्यासंबंधित रिव्ह्यू नक्की वाचा. अनेकदा आपण थर्ड पार्टी प्ले स्टोरवरून अ‍ॅपला डाउनलोड करत असतो. मात्र, असे अ‍ॅप तुमच्या फोनमधील डेटा चोरू शकतात व यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल.

हेही वाचा: Year Ender 2022: २०२२ मध्ये 'या' टॉप-५ बाईक्सने गाजवले मार्केट, जाणून घ्या काय आहे खास