Top 5 110cc Scooters
Top 5 110cc Scootersesakal

Top 5 110cc Scooters : 110cc च्या टॉप 5 स्कूटर, किंमत जाणून व्हाल हैराण

भारतात स्कूटरला खूप मोठी डिमांड

Top 5 110cc Scooters : भारतात स्कूटरला खूप मोठी डिमांड असते. खास करून 110cc मॉडेलला जास्तीची मागणी आहे. खरं म्हणजे 60 टक्के बाजारातील भागीदारीसोबत 100-110cc स्कूटर सेगमेंट ओवरऑल विना गियरचे दुचाकी बाजारात सर्वात मोठे योगदान आहे. आज आम्ही तुमहाला या ठिकाणी भारतात विकणाऱ्या टॉप 5 बेस्ट 110cc स्कूटर्सची माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Top 5 110cc Scooters
Brain Health : या सवयींमुळे तुमच्या मेंदूची ताकद कमी होते

Honda Activa

Honda Activa ला खूप मागणी आहे. सध्या हे भारतात सर्वात जास्त विकले जाणारे स्कूटर आहे. Activa 6G मध्ये एक 109.51cc सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन दिले आहे. जे इंजिन 7.73 bhp चे पॉवर आणि 8.90 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. याची एक्स शोरूम किंमत 75 हजार 347 रुपये ते 81 हजार 348 रुपये पर्यंत आहे.

Top 5 110cc Scooters
Pregnancy Tips : तिशीनंतर गर्भधारणेत येतात या अडचणी

TVS Jupiter

TVS Jupiter एक चांगले फॅमिलीसाठी स्कूटर आहे. हे स्कूटर चेन्नई येथील सर्वात जास्त विकणारे स्कूटर आहे. टीव्हीएस जुपिटर मध्ये 109.7cc, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन मिळते. हे इंजिन 7.7 bhp पॉवर जनरेट करते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 72 हजार 190 रुपये ते 88 हजार 498 रुपये आहे.

Top 5 110cc Scooters
Travel Diaries : आहाहा! काय नजारा... आयुष्यात एकदा तरी हा उलटा धबधबा बघा, सहलीची मज्जा होईल डबल

Hero Pleasure Plus

Hero Pleasure Plus महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या स्कूटरमध्ये 110.9cc, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, FI इंजिन मिळते. हे इंजिन 7.9 bhp चे पॉवर आणि 8.70 Nm चे टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 69 हजार 638 रुपये ते 78 हजार 538 रुपये पर्यंत आहे.

Top 5 110cc Scooters
Tesla Electric Car घेऊन महिला गेली पेट्रोल पंपावर; पेट्रोल कसं भरावं तेच कळेना अन्...| Video Viral

Honda Dio

Honda Dio एक चांगल्या लूकचे स्कूटर आहे. याला पुरूष आणि महिला दोघेही पसंत करतात. हे इंजिन 7.6 bhp चे पॉवर आणि 9 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत CVT गियरबॉक्स जोडले आहे. याची किंमत 68 हजार 625 रुपये ते 72 हजार 626 रुपये दरम्यान आहे.

Top 5 110cc Scooters
Car Tips : कार खरेदी करताय? या आहेत भारतातल्या टॉप CNG मॉडेल्स अन् तेही 8 लाखात... 

Hero Xoom

110cc स्कूटर सेगमेंट मध्ये नुकतीच Hero Xoom ची एन्ट्री झाली आहे. या स्कूटर मध्ये 110.9cc, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.05 bhp चे पॉवर आणि 8.7 Nm चे टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 69 हजार 99 रुपये ते 77 हजार 199 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com