Viral Video
Viral VideoSakal

Tesla Electric Car घेऊन महिला गेली पेट्रोल पंपावर; पेट्रोल कसं भरावं तेच कळेना अन्...| Video Viral

बराच वेळ ती पेट्रोल कसं भरावं याचा विचार करत थांबली होती, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

काही लोकांना आपण आपल्या आयुष्यात काय करतोय याचं भान नसतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला टेस्लाची इलेक्ट्रिक कार घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्याचं दिसत आहे. हा प्रकार पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

Viral Video
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पण एक इलेक्ट्रिक कारसुद्धा या रांगेत असून एक महिला या गाडीतून उतरते आणि पेट्रोल भरण्यासाठी जाते. पण गाडीमध्ये पेट्रोल कुठून भरायचं हे तिच्या लक्षात येत नाही.

त्यामुळे ती आश्चर्यचकित होऊन फक्त पाहत राहते. त्यानंतर एक व्यक्ती उतरतो आणि तिला सांगतो की ही इलेक्ट्रिक कार आहे. त्यानंतर या महिलेच्या डोक्यात उजेड पडतो आणि ती तेथून निघून जाते.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्याला हसू आवरणार नाही.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com