Top 5 Family Cars : मोठ्या कुटुंबासाठी परवडतील अशा टॉप 5 फॅमिली कार

आपल्याला आपल्या कुटुंबासाठी नेहमीच सुरक्षित प्रवास हवा असतो
Top 5 Family Cars
Top 5 Family Cars esakal
Updated on

Top 5 Family Cars : आपल्याला आपल्या कुटुंबासाठी नेहमीच सुरक्षित प्रवास हवा असतो. पण यासाठी आपलं बजेट कोलमडू नये शिवाय चांगली कारही खरेदी करता यावी अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे कौटुंबिक प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी 7 -8 सीटर कार सर्वोत्तम आहेत.

Top 5 Family Cars
Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

यापैकी मारुती XL6, Ertiga, Kia Carens, Innova Hycross सारख्या कारना जोरदार मागणी आहे. मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या टॉप 5 फॅमिली कार कोणत्या आहेत ते आज आम्ही सांगणार आहोत.

Top 5 Family Cars
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

1. Maruti Suzuki Ertiga : मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार आहे. त्यात सीएनजीचा ऑप्शन ही देण्यात आला आहे. चांगले फीचर्स आणि वैशिष्ट्यांसह, ही कार मोठ्या कुटुंबासाठी योग्य पर्याय ठरू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे.

Top 5 Family Cars
Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

2. Kia Carens : Kia Carens मध्ये 6 आणि 7 सीटर असे दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत. ही Kia ची भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय MPV कार आहे. Carens ची एक्स-शोरूम किंमत 10.44 लाख रुपयांपासून सुरू होते.

Top 5 Family Cars
Best Mileage Cars : खिशाला परवडणाऱ्या या कार्स देतात सर्वाधिक मायलेज

3. Maruti Suzuki XL6 : मारुती XL6 ही एक प्रीमियम MPV कार आहे. ही कार मुख्यत्वे मारुती एर्टिगा मॉडेल बेस्ड कार आहे. ही कार मारुतीच्या महागड्या कार डीलरशिप Nexa मार्फत विकली जाते. बाजारात त्याची एक्स-शोरूम किंमत 11.41 लाख रुपयांपासून सुरू होते.

Top 5 Family Cars
Upcoming SUV Cars : ह्युंदाई क्रेटाला टक्कर द्यायला येणार या तीन नव्या SUV

4. Hyundai Alcazar: Hyundai Alcazar मध्ये थ्री सीटर बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीची कार टाटा सफारी, किया केरेन्स आणि महिंद्रा XUV700 सारख्या कारशी स्पर्धा करते. दमदार वैशिष्ट्यांसह सुसज्ज, Alcazar ची एक्स-शोरूम किंमत 16.74 लाख रुपयांपासून सुरू होते.

Top 5 Family Cars
Technology Tips : आता फेसबुक-इन्स्टाग्रामवर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार पैसे

5. Toyota Innova Hycross: इनोव्हा हायक्रॉस हे टोयोटाच्या लोकप्रिय एमपीव्ही इनोव्हाचं नवं मॉडेल आहे. ही कार हायब्रिड टेक्नोलॉजी मध्ये सादर करण्यात आली आहे. कार मोठ्या कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय आहे कारण ती 7-8 सीटर असा ऑप्शन देते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 18.55 लाख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com