Toyota Cars Called Back : टोयोटाने परत मागवल्या तब्बल 2000 हून अधिक गाड्या; फ्युअल टँकमध्ये आढळली त्रुटी

Toyota Cars Fuel Tank Issue : फ्युअल टँकमध्ये आढळलेल्या त्रुटीमुळे गाडीचं इंजिन मध्येच बंद पडू शकतं, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
Toyota Cars Called Back
Toyota Cars Called BackeSakal

Toyota Glanza Cars Recalled : टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने आपल्या दोन हजारहून अधिक गाड्या रिकॉल केल्या आहेत. ग्लांझा या हॅचबॅक कारच्या फ्युअल टँकमध्ये असलेल्या त्रुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या त्रुटीमुळे गाडीचं इंजिन मध्येच बंद पडू शकतं, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

कोणत्या गाड्या मागवल्या परत?

टोयोटा मोटर्सने 2 एप्रिल 2019 ते 6 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅन्युफॅक्चर केलेल्या गाड्यांना परत मागवलं आहे. या दरम्यान तयार झालेल्या ग्लांझा हॅचबॅक कार्सचे एकूण 2,305 युनिट्स कंपनीने रिकॉल केले आहेत. टोयोटा या गाड्यांच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देत आहे. (Toyota Motors)

मोफत करणार दुरुस्ती

दरम्यान, या गाड्यांच्या फ्युअल टँकमध्ये आढळणारी त्रुटी आपण मोफत ठीक करून देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यासाठी ग्राहकांना जवळच्या अधिकृत टोयोटा शोरुमला भेट द्यावी लागणार आहे. टोयोटाच्या ग्लांझा (Toyota Glanza Hatchback) कारचे चार व्हेरियंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ही त्रुटी एका विशिष्ट व्हेरियंटमध्ये आहे की सर्व व्हेरियंटमध्ये याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.

Toyota Cars Called Back
Xiaomi SU7 : टेस्लाचं दुकान होणार बंद? श्याओमीने स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

टोयोटाच्या गाड्या महागल्या

दरम्यान, निर्मिती खर्च वाढल्यामुळे टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (TKM) भारतात आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. भारतात Toyota Kirloskar Motors च्या एकूण 11 गाड्या उपलब्ध आहेत. या सर्व गाड्यांची किंमत सुमारे 1 टक्क्यांनी वाढल्याचं कंपनीने सांगितलं आहे. एक एप्रिलपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com