Ethanol Car: १००% इथेनॉलवर धावणारी Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती!

१००% इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली टोयोटा इनोवा हायक्रॉस फ्लेक्स-फ्युएल लवकरच लाँच होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती...
Toyota Innova Hycross Flex-Fuel Nitin Gadkari Announces 100% Ethanol Variant Launch

Toyota Innova Hycross Flex-Fuel: Nitin Gadkari Announces 100% Ethanol Variant Launch

esakal 

Updated on: 

Toyota Innova Hycross Flex-Fuel: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटा (Toyota) आपली बहुप्रतिक्षित 'इनोवा हायक्रॉस फ्लेक्स-फ्युएल' (Innova Hycross Flex-Fuel) ही कार लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही कार १००% इथेनॉलवर (Ethanol) धावणारी जगातील पहिली फ्लेक्स-फ्युएल स्ट्रॉन्ग हाइब्रिड कार ठरणार असून, २५ नोव्हेंबरला ही गाडी अधिकृतपणे बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या 'ENRich 2026' एनर्जी कॉन्फरन्समध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, या महिन्यात १००% इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटा इनोवा हायक्रॉसचे अनावरण करण्यात येईल.

Loading content, please wait...