
Toyota भारतात 4,800 कोटींची गुंतवणूक; मारुती, टाटाची चिंता वाढली
भारतातील मारुती, ह्युंदाई, टाटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी टोयोटा सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच आता ऑटोमोबाईल निर्माता टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा समूहाच्या इतर कंपन्यांनी ते इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EVs) वापरल्या जाणार्या कंपोनंटचे स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी कर्नाटकमध्ये सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे इतर वाहन उत्पादकांची चिंता नक्कीच वाढणार आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ही टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स (TKAP) च्या सहकार्याने 4,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर आणखी एक कंपनी टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया (TIEI) 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
TKM आणि TKAP ने शनिवारी या संदर्भात कर्नाटक सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. TKM चे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. आम्ही हे 'गो ग्रीन, गो लोकल' या भावनेने करत आहोत आणि कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठीच्या मोहिमेत योगदान देणे हे आमचे उद्दीष्ट आहे.
ते म्हणाले की , ईव्ही डिव्हाईसचे उत्पादन लोकल लेव्हलवर उत्पादन वाढवण्यासोबत जॉब्स स्थानिक लोकांच्या विकासाला चालना मिळेल, गुलाटी म्हणाले की, TKM आणि TKAP मिळून सुमारे 3,500 नवीन रोजगार निर्माण करतील. सप्लाय चेन विकसित झाल्यावर ही संख्या वाढेल.
यावेळी बोलताना TKM चे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर म्हणाले की टोयोटा ग्रुपच्या कंपन्यांनी यापूर्वीच 11,812 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि 8,000 हून अधिक लोकांना रोजगार निर्माण केला आहे. या सामंजस्य करारावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि किर्लोस्कर यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी राज्याचे मोठे व मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश आर निरानी हे देखील उपस्थित होते.