esakal | Airtel ने ऑगस्ट महिन्यात Jio ला केलं क्रॉस
sakal

बोलून बातमी शोधा

airtel

देशात जुलै महिन्यात भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ कंपनी आघाडीवर होती. पण आता या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये एअरटेलने ग्राहक मिळवण्यात आघाडी घेतली आहे.

Airtel ने ऑगस्ट महिन्यात Jio ला केलं क्रॉस

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीमसा

नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ कंपनी आघाडीवर होती. पण आता या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये एअरटेलने ग्राहक मिळवण्यात आघाडी घेतली आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन रिपोर्टनुसार ऑगस्ट 2020 मध्ये एअरटेलला 28.99 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत, तर जिओला ऑगस्टमध्ये 18.64 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. तर दुसऱ्याबाजूल व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे Vi च्या ग्राहकांतही घट झाल्याचं दिसलं आहे. Vi ला ऑगस्ट महिन्यात 12.28 नवीन ग्राहक मिळाले आहेत.

35.8 टक्क्यांसह जिओ आघाडीवर-
भारतीय दूरसंचार बाजारपेठेत रिलायन्स जिओचा हिस्सा 35.08 टक्क्यांवर गेला आहे, तर एअरटेलचा बाजारपेठेतील हिस्सा 28.12 टक्के आहे. 40 कोटींहून अधिक ग्राहक असलेले रिलायन्स जिओ हे देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे.

जगभरात काही तासांसाठी YouTube सेवा विस्कळीत

ट्रायच्या नव्या आकडेवारीनुसार देशात वायरलेस ग्राहकांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या 114.418 कोटी होती जी वाढून आता 114.792 कोटींवर गेली आहे. ऑगस्ट महिन्यात ही संख्या 0.33 टक्क्यांनी वाढली आहे.

Vi ठरले भारताचे सर्वांत वेगवान फोर जी

रिलायन्स जिओला जुलैमध्ये 35.54 लाख नवीन ग्राहक जोडले गेले होते, पण ऑगस्टमध्ये कंपनीचे सुमारे 50 टक्के नुकसान झाले. या महिन्यात जिओला फक्त 18.64 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. जुलै महिन्यात एअरटेलला 32.60 लाख ग्राहक मिळाले होते तर ऑगस्टमध्ये 28.99 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. एअरटेललाही तोटा सहन करावा लागला आहे. पण नवीन ग्राहक मिळवण्याच्या यादीत एअरटेल आघाडीवर राहिली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image