आता मोबाईलवर अनोळखी कॉलरचे नावही दिसणार; 'हे' फीचर देणार Truecaller ला टक्कर

लवकरच तुम्हाला नंबरप्रमाणेच अनोळखी कॉलरचे नावही दिसणार आहे
Truecaller
Truecallersakal

TRAI KYC Caller Id App : आत्तापर्यंत अनोळखी कॉल आला की तुम्हाला त्याचा नंबर स्क्रीनवर दिसतो. पण लवकरच तुम्हाला नंबरप्रमाणेच अनोळखी कॉलरचे नाव दिसेल. म्हणजेच, जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करेल तेव्हा तुम्हाला फक्त त्याचा नंबरच नाही तर त्याचे नाव देखील दिसेल.

स्पॅम कॉल्समुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. तुम्ही DND लागू करा किंवा इतर कोणतेही वैशिष्ट्य, हे टेलीमार्केटिंग कॉल टाळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. त्याच वेळी, फसवणूक कॉलची आणखी एक समस्या आहेच. अशा कॉलमध्ये, स्कॅमर बँक एक्झिक्युटिव्ह किंवा इतर कोणतीही व्यक्ती असल्याचे भासवून कॉल करतात.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सर्व प्रयत्न करूनही अशा कॉल्सवर नियंत्रण मिळवता आले नाही. हे सर्व टाळण्यासाठी ट्राय एका नवीन फीचरवर काम करत आहे. सध्या या फीचरबद्दल अधिकृतरित्या जास्त माहिती समोर आलेली नाही.

Truecaller
FIFA World Cup 2022 : फुटबॉलप्रेमींसाठी Jio ची भन्नाट ऑफर; 5 नवीन प्लॅन लाँच

TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) चे नवीन वैशिष्ट्य कॉलर ओळखीशी संबंधित आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या नंबरवरून कॉल येईल, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव देखील दिसेल. हे नाव वापरकर्त्याच्या केवायसीनुसार असेल. म्हणजेच ज्याच्या नावावर सिम असेल, तुम्हाला फक्त त्याचं नाव दिसेल.

हा नियम लागू होताच, वापरकर्त्यांना त्या कॉलरचे नाव देखील दिसेल, ज्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्राय पुढील तीन आठवड्यात हे फीचर जारी करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com