esakal | Triumph ची सर्वात स्वस्त Street Scrambler बाईक भारतात लॉंच, वाचा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Street Scrambler

Triumph ची सर्वात स्वस्त Street Scrambler बाईक भारतात लॉंच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बाईक बनवणारी ब्रिटीश कंपनी Triumph Motorcycles ही त्यांच्या पावरफुल आणि हाय परफॉर्मन्स बाईक्ससाठी ओळखली जाते, या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त Street Scrambler बाईक लॉन्च केली आहे. दमदार लुक आणि मजबूत इंजिन क्षमता असलेल्या या बाईकची किंमत 9.35 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनीने आजपासून या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. आपण या बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

कंपनीने या बाईकमध्ये 900cc क्षमतेचे नवीन BS6 स्टँडर्ड ट्विन इंजिन वापरले आहे. हे इंजिन 64.1bhp ची पॉवर आणि 80Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते दरम्यान या बाईकमध्ये देण्यात आलेले कंपोनंट्स आणि सस्पेंशन हे या आधिच्या मॉडल्सप्रमाणेच आहे.

या बाईकमध्ये समोर 41mm टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूस ट्विन साइड स्प्रिंग सस्पेंशन दिले आहे. यात 19-इंच व्हिल आणि 310 मिमी डिस्क ब्रेक दिलेले असून 17-इंच व्हील आणि मागील बाजूस 255 मिमी डिस्क अलेल. ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि USB चार्जिंग सॉकेट देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये स्पोर्ट स्प्लिट सीट, राऊंड हेडलॅंप, सिंगल साईडेड ट्विन एक्झॉस्ट, नॉबी टायर्स देण्यात आले आहेत. ही बाईक अर्बन ग्रे, जेट ब्लॅक, मॅट आयर्नस्टोन सारख्या नवीन कलर्समध्ये येते. असे मानले जाते की या बाईकच्या बुकिंगनंतर कंपनी पुढच्या आठवड्यापासूनच बाईकची डिलिव्हरी सुरू करेल.

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

loading image
go to top