Truecaller मध्ये येतायत व्हिडिओ कॉलर ID सह अनेक भन्नाट फीचर्स; वाचा | Truecaller New Features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

truecaller

Truecaller मध्ये येतायत व्हिडिओ कॉलर आयडीसह अनेक भन्नाट फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Truecaller new features : कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप Truecaller ने गुरुवारी घोषणा केली आहे की ते येत्या आठवड्यात भारतात Android फोन वापरकर्त्यांसाठी काही नवीन फीचर्स लॉन्च करणार आहे. यात व्हिडिओ कॉलर आयडी, कॉल रेकॉर्डिंग आणि घोस्ट कॉल्स आणि वापरकर्त्यांसाठी अनाऊंस कॉल यांसारखी प्रीमियम फीचर्सचा समावेश असणार आहे.

Truecaller चे भारतात 22 कोटी वापरकर्ते

स्टॉकहोम, स्वीडनच्या या कंपनी Truecaller चे जगभरात एकूण 300 मिलीयन मासिक वापरकर्ते आहेत, त्यापैकी तीन चतुर्थांश (220 मिलीयन) वापरकर्ते भारतात आहेत. Truecaller Version 12 वापरकर्त्यांसाठी रीडिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडीओ कॉलर आयडी, कॉल रेकॉर्डिंग, घोस्ट कॉल आणि कॉल अनाऊंसमेंट नवीन अले फीचर्स आहेत. येत्या आठवडाभरात हे सर्व फीचर्स भारतासह अनेक देशांमधील वापरकर्त्यांसाठी हळूहळू सुरू केले जातील.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

व्हिडिओ कॉलर आयडी

व्हिडिओ कॉलर आयडीमध्ये, वापरकर्ते एक लहान व्हिडिओ आयडी सेट करू शकतील आणि जेव्हा तुम्ही मित्र आणि नातेवाईकांनी कॉल केल्यास आपोआप तो व्हिडिओ आयडी प्ले होईल. युजर्स इन बिल्ट व्हिडिओ टेम्पलेट वापरू शकतात किंवा त्यांचे स्वतःचे व्हिडिओ तयार करू शकतात. हे फीचर्स सर्व Truecaller Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

नवीन इंटरफेस

Truecaller ने कॉल आणि SMS साठी वेगळे टॅब दिले आहेत. वेगळ्या टॅबसह तुम्ही आता तुमचे सर्व SMS, Truecaller ग्रुप चॅट्स आणि पर्सनल चॅट्स फक्त एका टॅपने ऍक्सेस करू शकता.

हेही वाचा: तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; जाणून घ्या पध्दत

कॉल रेकॉर्डिंग

कॉल रेकॉर्डिंग फीचर अँड्रॉइड 5.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणार्‍या डिव्हाइसवर वापरले जाऊ शकते. यामध्ये, कॉल रेकॉर्डिंगसह, आपण इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करू शकता. हे स्मार्टफोनच्या कॉल रेकॉर्डिंगपेक्षा वेगळे असेल. Truecaller या रेकॉर्डिंगचा एक्सेस देण्यात आलेला नीह. तसेच हे रेकॉर्डिंग डिलीट देखील करता येईल. रेकॉर्डिंग ईमेल, ब्लूटूथ द्वारे शेअर देखील केले जाऊ शकते.

घोस्ट कॉल

घोस्ट कॉल नावाप्रमाणेच, एक वास्तविक कॉल आहे जो सेट केला जाऊ शकतो. जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या बोलण्याचा कंटाळा येत असेल आणि तेथून बाहेर पडायचे असेल, तेव्हा तुम्ही फोन करण्याचा बहाणा करून निघून जाऊ शकता. घोस्ट कॉलसाठी तुम्ही कोणतेही नाव, नंबर आणि फोटो सेट करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीचा कॉल येत आहे असे वाटते. घोस्ट कॉल्स फक्त Truecaller प्रीमियम आणि गोल्ड सदस्यांसाठी उपलब्ध असतील.

कॉलची अनाऊंस

Truecaller इनकमिंग फोन कॉल्स आल्यानंतर कॉल करणाऱ्याचा कॉलर आयडी मोठ्याने सांगेल. यामुळे स्क्रीनकडे न पाहता, तुम्हाला कळू शकेल की कोणाचा कॉल येत आहे. हेडफोन वापरताना देखील हे फीचर काम कर,ते घोस्ट कॉल प्रमाणे, कॉल अनाउन्स फक्त प्रीमियम आणि गोल्ड ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

loading image
go to top