Truecaller चं Caller ID फिचर आता WhatsApp अन् इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर

ऑनलाईन स्कॅम आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ट्रू कॉलरनी हा निर्णय घेतलाय.
Truecaller
Truecallersakal

Truecaller Caller ID Service  : कॉलरची ओळख पटवून सांगणारी ट्रू कॉलर कंपनी सर्वांनाच माहिती असेल. अनेकदा आपल्याला अनोळखी नंबरवरुन कोणाचा कॉल आलाय, हे कॉल उचलण्यापूर्वीच आपल्याला ओळख सांगणारी ट्रू कॉलर कंपनीने आता नवी घोषणा केली आहे.

आता ट्रू कॉलर कंपनी कॉलरची ओळख पटवून सांगणारं फिचर वॉट्सअप आणि इतर मेसेजिंग अॅपलाही लागू करणार आहे. ट्रू कॉलरच्या या नव्या घोषणेने सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ऑनलाईन स्कॅम आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ट्रू कॉलरनी हा निर्णय घेतलाय.

ट्रू कॉलरची सध्या Caller identification फिचर बेटा फेजमध्ये WhatsApp आणि इतर मेसेजिंग अॅपसाठी टेस्टींग सुरू आहे. महिन्याभरात हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध होणार.

स्कॅमर इंडोनेशिया (+62), केनिया (+254), इथिओपिया (+251), मलेशिया (+60), व्हिएतनाम (+84) आणि इतर सारख्या देशाच्या इंटरनॅशनल नंबरवरून WhatsApp यूजर्सला ट्रॅक करत त्यांना कॉल करताहेत.

Truecaller
Online Fraud करणाऱ्याला महिलेने शिकवला चांगलाच धडा; Whatsapp Chatting वाचून पोट धरून हसाल

असंही म्हटले जात आहे की स्कॅमर्सच्या रडारवर end-to-end encrypted मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यात टेलिग्राम आणि वॉट्सअपचा समावेश आहे.

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला फेब्रुवारीमध्ये एआय फिचरचा वापर करुन त्यांच्या नेटवर्कवर टेलिमार्केटिंग कॉल ब्लॉक करण्यास सांगितले होते. याच दरम्यान Truecaller ने यासंदर्भात telcos सोबत चर्चा सुद्धा केली होती.

Truecaller
WhatsApp update : WhatsApp मध्ये होणार नवा बदल, एकाच स्क्रीनवर अनेक लोकांसोबत करा बिनधास्त चॅटिंग

ट्रूकॉलरनी एप्रिलच्या सुरवातीला Live Caller ID फिचर आयफोन युजर्ससाठी लॉन्च केले. यासाठी आयफोन युजर्सला या फिचरचा वापर करण्यासाठी प्रिमियम पे करावे लागणार आहे. ट्रूकॉलर प्रिमियम सबस्क्रीप्शन हे प्रिमियम आणि गोल्ड प्रिमियममध्ये उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या तुम्ही जर या सबस्क्रीप्शचा वापर करत असाल तर तुम्हाला वर्षाला हे 529 रुपयांना मिळणार तर तीन महिन्याला 179 रुपयांना मिळणार. ट्रू कॉलरचा Gold subscription हा वर्षाला 5000 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com