esakal | TVS Jupiter 125 Vs Honda Activa 125 : कोणती आहे बेस्ट? पाहा स्पेसिफिकेशन
sakal

बोलून बातमी शोधा

TVS Jupiter 125 and Honda Activa 125

TVS Jupiter 125 Vs Honda Activa 125 : कोणती आहे बेस्ट? पाह डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

TVS Jupiter 125 Vs Honda Activa 125 : स्कूटर खरेदीचा विचार करत असाला तर बाजारात तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक TVS Jupiter 125 ही स्कूटर काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आली आहे. इंडिया यामाहा मोटरने या स्कुटरमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स दिले आहेत. 125 सीसी सेगमेंटमध्ये लॉंच केलेल्या या स्कूटरची तुलना बाजारात उपलब्ध असलेल्या Honda Activa 125 या स्कूटरशी होत आहे. आज आपण या दोन्ही स्कूटरचे स्पेसिफिकेशनची तुलना करणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला बेस्ट ऑप्शन खरेदी करता येईल.

इंजिन कसे आहेत?

TVS Jupiter 125 स्कूटरमध्ये तुम्हाला 124.8 सीसी सिंगल सिलिंडर, 2 वाल्व, 4-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन मिळेल. तर Honda Activa 125 मध्ये पावरफुल बीएस 6 कंप्लायंट 124 सीसी 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर, फॅन-कूल्ड एसआय इंजिन देण्यात आले आहे,

परफॉर्मंस कसा मिळेल?

TVS ज्युपिटर 125 चे इंजिन 6500 rpm वर 8.04 bhp ची मॅक्झिमम पावर आणि 4500 rpm वर 10.5 Nm ची पीक टॉर्क जनरेट करते. TVS ज्युपिटर 125च्या इंजिनमध्ये तुम्हाला CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनन देण्यात आले आहेतर Honda Activa 125 बद्दल बोलायचे झाल्यास या स्कूटरचे इंजिन 6750 आरपीएमवर 8.18 बीएचपीची पावर आणि 5000 आरपीएमवर 10.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन CVT ने सुसज्ज आहे.

TVS ज्युपिटर 125 मध्ये समोर 230 मिमी डिस्क ब्रेक किंवा 130 मिमी ड्रम ब्रेक ऑप्शनल असेल. त्याचबरोबर त्याच्या मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. तर Honda Activa 125 च्या समोर 130 मिमी डिस्क ब्रेक दिले असून त्याच्या मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आहे.

हेही वाचा: वर्षानुवर्षे कार नवीन ठेवायचीय? मग या सोप्या टिप्स करा फॉलो

सस्पेंशन

टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये समोर टेलिस्कोपिक हायड्रॉलिक्स आहेत आणि मागील बाजूस मोनोट्यूब इन्व्हर्टेड गॅस फील्ड शॉक (एमआयजी) सह स्प्रिंग एडेड 3-स्टेप एडजस्टेबल सस्पेंश दिले आहे.

डायमेंशन्स

टीव्हीएस ज्युपिटर 125 ची लांबी 1852 मिमी, रुंदी 681 मिमी आणि उंची 1168 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 1275 मिमी आहे. त्याच वेळी, त्याचे ग्राउंड क्लिअरन्स 163 मिमी आहे. त्याची सीटची उंची 790 मिमी आहे. Honda Activa 125 ची लांबी 1850 mm, रुंदी 707 mm आणि उंची 1170 mm आहे. त्याच वेळी, त्याचा व्हीलबेस 1260 मिमी आहे. तर, त्याची ग्राउंड क्लिअरन्स 169 मिमी आहे. त्याची सीटची उंची 712 मिमी आहे. टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये 5.1 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी दिली आहे याचे कर्ब वजन 108 किलो आहे, तर Honda Activa 125 मध्ये 5.3 लिटरची इंधन टाकी मिळेल आणि या स्कूटरचे कर्ब वजन 111 किलो आहे.

किंमत

टीव्हीएस ज्युपिटर 125 ची किंमत 73,400 रुपयांपासून सुरु होते जी 81,300 रुपयांपर्यंत जाते. होंडा अॅक्टिवा 125 ची एक्स-शोरूम किंमत 73,203 रुपयांपासून सुरु होते जी 80,325 रुपयांपर्यंत जाते.

हेही वाचा: तुमचा स्मार्टफोन ओव्हरहीट होतोय? तर लगेच बदला 'या' सेटींग्ज

loading image
go to top