ट्विटरचा मोठा निर्णय; आता 'या' सर्विससाठी द्यावे लागणार पैसे

TweetDeck May Soon Become a Paid Twitter Blue Feature
TweetDeck May Soon Become a Paid Twitter Blue Feature
Updated on

जगात काहीही फुकट मिळत नाही अशी एक जुनी म्हण आहे. डिजिटल जगाच्या सुरुवातीला ही म्हण प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षपणे खरी ठरत आहे. गुगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सर्व सोशल मीडिया साइट्स मोफत सेवा देत आहेत असे सर्व सामान्य लोकांना वाटते पण तसे अजिबात नाही. या कंपन्या वापरकर्त्यांकडून केवळ थेटच नाही तर इतर अनेक मार्गांनी शुल्क आकारतात. या कंपन्यांमध्ये सामान्य गोष्ट अशी आहे की, प्रथम ते विनामूल्य सेवा देऊन यूजर्सला सवय लावतात आणि नंतर ते त्यांच्या सेवेसाठी शुल्क आकारू लागतात. (TweetDeck May Soon Become a Paid Twitter Blue Feature)

TweetDeck May Soon Become a Paid Twitter Blue Feature
OnePlus 10 Pro आज भारतात होणार लॉन्च; लाइव स्‍ट्रीम, फीचर्स, किंमत जाणून घ्या

TweetDeck विनामूल्य नसेल

ट्विटरच्या वापराची सवय अंगवळणी पडल्यानंतर आता कपंनीने जगभरातील लाखो यूजर्सना धक्का देणार आहे. Twitter चे TweetDeck यापुढे विनामूल्य असणार नाही. TweetDeck ची नवीन आवृत्ती ट्विटर ब्लू सर्विसचा हा भाग असेल. एका ट्विपस्टरने याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ट्विटरने ट्विटडेकच्या डिझाइनमध्ये मोठे बदल केले होते.

रिव्हर्स इंजीनिअरिंग एक्सपर्ट Jane Manchun Wong यांनी एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, ट्विटर शुल्क-आधारित सेवा म्हणून TweetDeck पुन्हा लॉन्च करणार आहे. ते Twitter Blue सर्विसमध्ये जोडले जाईल. नवीन अपडेटनंतर यूजर्सना अॅडव्हान्स सर्चचा पर्यायही मिळेल. नवीन अपडेटमध्ये फोटो, व्हिडीओ, gif आणि इमोजींबाबतही अनेक बदल पाहायला मिळतील.

TweetDeck May Soon Become a Paid Twitter Blue Feature
Appleच्या चाहत्यांना झटका! कंपनी आता 'हे' iPhones दुरुस्त करणार नाही कारण..

TweetDeck काय आहे?

TweetDeck हे Twitter चे एक पर्यायी प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला एकाच वेळी अनेक अकाऊंट वापरण्याची आणि एकाच वेळी अनेक अकाऊंटचे फीड्स पाहण्याची परवानगी देते. Tweetdeck मध्ये देखील अनेक फिचर्स आहेत जी Twitter मध्ये नाहीत. उदाहरणार्थ, आपण Twitter द्वारे ट्विट शेड्यूल करू शकत नाही, परंतु TweetDeck मध्ये हे फिचर आहे. Tweetdeck हे 12 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते आणि 2011 मध्ये Twitter ने खरेदी केले होते. TweetDeck सामान्यतः मीडिया हाऊस आणि मोठ्या संस्था वापरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com