ट्विट एडिट फीचर्सबाबत विचार सुरू 

Twitter asks for feedback, users demand editing option
Twitter asks for feedback, users demand editing option

मुंबई :  "शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात', अशी एक इंग्रजी म्हण आहे. तुम्ही ट्विटर वापरत असाल तर ही म्हण किती सत्य आहे हे तुम्हाला माहीत असेलच. गेल्या वर्षभरात केवळ एका ट्विटमुळे अनेक जण वादाच्या भोवऱ्यात सापडले, अनेकांना मनस्ताप झाला; परंतु अजाणतेपणी झालेल्या चुका टाळण्यासाठी ट्विटर आता "ट्विट एडिट फीचर्स'चा विचार करत आहे. ट्‌विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक दोरसे यांनीच ही माहिती दिली आहे. 


ट्विटरवर एखादी ट्विट पोस्ट केल्यानंतर त्यातील एखादे स्पेलिंग किंवा शब्द चुकल्यास युजर्सना तो बदलण्याची सोय नसल्याने युजर्सना ट्विट डिलीट करावे लागत होते. आता मात्र ट्‌विटर टाइमलाइनवर पोस्ट केलेला तुमचं ट्विट तुम्हाला एडिट (दुरुस्त) करता येणार आहे. 2017 या नव्या वर्षात ट्‌विटरवर युजर्सना काय काय बदल अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सीईओ जॅक दोरसे यांनी लोकांची मते मागविली होती. यामध्ये सर्वाधिक लोकांनी ट्विट एडिट करण्याचा पर्याय आवश्‍यकच असल्याचे मत नोंदविले. यातील एका युजर्सच्या ट्विटला रिप्लाय देत दोरसे यांनी "तुम्हाला काही क्षणात ट्विट दुरुस्त करायच्या आहेत की तुम्ही कधीही त्या दुरुस्त करू इच्छिता', असा प्रश्‍न केला, तर अन्य एका युजरला त्यांनी "तुम्हाला यासाठी पाच मिनिटांची वेळ पुरेशी ठरेल का', असेही विचारले आहे. 

ट्विटरची महती 
सोशल नेटवर्किंगमध्ये फक्त 140 अक्षरांच्या (कॅरेक्‍टर्स) जोरावर आपलं स्थान अढळ करणारे ट्‌विटर हे महत्त्वाचं माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ ट्‌विटरवर उपलब्ध आहे. अनेक सरकारी निर्णय आणि बातम्या यांचा मुख्य स्रोत हल्ली ट्‌विटर टाइमलाइन आहे. ट्‌विटरवर अनेक सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते स्वतः उपलब्ध असतात. ट्‌विटरच्या ट्रेण्ड्‌सने जगभरात अनेक बातमीपत्रांचा क्रमही निश्‍चित केला जातो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com