Twitter Ads : इलॉन मस्कचं ट्विटर यूजर्सना गिफ्ट! आता जाहिरातींमधून कमावता येणार पैसे | Twitter to pay verified content creators for ads in replies Elon Musk announces in a tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Twitter

Twitter Ads : इलॉन मस्कचं ट्विटर यूजर्सना गिफ्ट! आता जाहिरातींमधून कमावता येणार पैसे

इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्हेरिफाईड यूजर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. ट्विटच्या रिप्लायमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून या यूजर्सना आता पैसे कमावता येणार आहेत. मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

"येत्या काही आठवड्यांमध्ये ट्विटर कंटेंट क्रिएटर्सना रिप्लायमध्ये मिळणाऱ्या जाहिरातींसाठी पैसे देण्यास सुरूवात करेल. यासाठी पहिल्या टप्प्यात ५ मिलियन डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे." अशा आशयाचं ट्विट (Elon Musk Tweet) मस्क यांनी केलं आहे.

ही आहे अट

या स्कीमचा फायदा केवळ त्यांनाच मिळणार आहे ज्यांचं ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड असेल. ट्विटरचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी मस्कने सबस्क्रिप्शन सुविधा सुरू केली होती. याअंतर्गत ट्विटरवर ब्लू किंवा इतर रंगाची टिक हवी असल्यास महिन्याचे चार्जेस द्यावे लागतात. एकूणच, सबस्क्राईबर्सची संख्या वाढवण्यासाठी ही स्कीम फायद्याची ठरणार आहे.

जाहिरातदारांसाठी गळ

इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटरवरुन जाहिरातदारांनी पळ काढण्यास सुरूवात केली होती. मस्क यांचा हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय याला कारणीभूत ठरला होता. यानंतर आता ट्विटर या जाहिरातदार कंपन्यांना परत बोलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. ही स्कीमदेखील यासाठीच असलेला एक प्रयत्न आहे, असं म्हटलं जातंय.

ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याक्कारिनो यांची नियुक्तीदेखील हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली होती. लिंडा यांना जाहिरात क्षेत्राता भरपूर अनुभव आहे. त्यामुळे ब्रँड्स आणि त्यांचे ट्विटरशी असलेले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने लिंडा काम करत आहेत.

टॅग्स :TwitterElon Musk