Twitter Verification : ट्विटरवर ब्लू टिक कायम ठेवण्यासाठी तुम्हाला पण आलाय का मेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Verification

Twitter Verification : ट्विटरवर ब्लू टिक कायम ठेवण्यासाठी तुम्हाला पण आलाय का मेल

Twitter Technology : इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून सगळीकडेच ट्विटरची चर्चा सुरू झाली आहे. पण आता ट्विटरच्या पॉलिसी मध्ये सुद्धा बदल व्हायला सुरुवात झालीय. ट्विटरच्या व्हेरिफाईड हँडलसाठी तुम्हाला पैसे भरावे लागणार असल्याची बातमी समोर आली होती.

हेही वाचा: Technology : Amazon Sale मध्ये Redmi 10A Sport झाला खूपच स्वस्त, नवीन किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट आणखीन होऊ लागलीय ती म्हणजे ट्विटर हँडलवर ब्लू टिक असलेल्या युजर्सना आता इमेल येऊ लागलेत. तुम्हाला ब्लू टिक कायम ठेवायचे असतील तर त्याविषयीची माहिती या इमेल्स मध्ये दिली जात असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा: Technology : कपडे धुण्याचं टेन्शनंच संपलं; बादलीच करणार Washing Machine चं काम

बऱ्याच मेल्स मध्ये काही लिंक्स दिल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं ब्लु टिक कायम ठेवू शकता असंही म्हटलंय. पण जेव्हापासून ट्विटर ब्लू टिकसाठी चार्ज करणार आहे तेव्हापासूनच युजर्सना असे मेल यायला चालू झाले आहेत.

हेही वाचा: Technology Tips : लॅपटॉपचा वेग मंदावलाय ? हा उपाय केल्यास विनाअडथळा होईल काम

ट्विटरवर ब्लू टिक्स मिळवण्याच्या आमिषामुळे अनेकजण सायबर क्राइमचे बळी ठरतायत असं सायबर तज्ज्ञांचे म्हणणं आहे. शेकडो लोक संघटित पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. ब्लू टिक्सच्या नावाखाली लोकांकडून हजारो रुपये वसूल केले जात आहेत.बऱ्याचदा तर लोकांकडून पैसे उकळून पैसे घेणारा फरार होतोय. आता तर लोकांना त्यांच ब्लू टिक कायम ठेवण्यासाठी संपर्क करण्यास सांगणारे इमेल पाठवले जात आहेत.

हेही वाचा: Technology : ॲपल कंपनीचं न्यु जनरेशन भारतात लॉन्च; किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

व्हेरीफाईड स्टेटस कायम ठेवण्यासाठी येणारा मेल

या ईमेलमध्ये ज्या लिंक असतात ज्यावर युजर्सचा पासवर्ड आणि युजरनेम दिलेलं असतं. या इमेल्सच्या सब्जेक्टमध्ये Twitter Warning' किंवा 'Don't Lose Your Verified Status' लिहिलेलं असतं. साहजिकच लोक यावर विश्वास ठेवतात. आणि या लिंकवर क्लिक करतात. हे इमेल शेअर करणारे लोक कन्फर्म करण्याच्या नावाखाली लोकांकडून त्यांची संवेदनशील माहिती काढून घेतायत.

हेही वाचा: Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट

गुगलने अशा अनेक वेबसाइट्स आणि पेजेसना डाऊन केलंय. पण तरीही वेगवेगळ्या लोकांना असे मेल येत आहेत. हे मेल पूर्णपणे बनावट असून लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी पाठवले जात आहेत.ट्विटरने असे कोणतेही मेल लोकांना पाठवलेले नाहीत. तुम्हालाही असा मेल आला असेल त्याच्यापासून लांब राहा आणि त्यांना स्पॅम म्हणून मार्क करून ठेवा.

हेही वाचा: Twitter Feature : सर्वांना मोफत मिळणार ट्विटरचे 'हे' खास फीचर

रिपोर्टनुसार 7 नोव्हेंबरपासून ट्विटर व्हेरिफिकेशनची नवी सिस्टीम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख देण्यात आलेली नाही. इलॉन मस्क यांनी म्हटलंय की, ट्विटरमध्ये कंटेंट मॉडरेशनसाठी एक नवीन टीम तयार केली जाईल आणि सस्पेंड केलेल्या अकाऊंट्सवरही हीच टीम निर्णय घेईल.