Two Wheeler Tips : टू-व्हिलर सर्व्हिसिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

टू व्हिलरसाठी सर्व्हिसिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
Two Wheeler Servicing
Two Wheeler Servicingesakal
Summary

टू व्हिलरसाठी सर्व्हिसिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.

पुणे : शहरातील प्रत्येकाला कुठेतरी घाईगडबडीत जायचे असते. वेळ असतो, पण तरीही वाघ मागे लागल्यासारखे प्रत्येकजण पळत असतो. कमी वेळेत काम लवकर व्हावे म्हणून माणसाने साधनांचा, यंत्रांचा शोध लावला. असेच एक उपयुक्त साधन म्हणून टू -व्हिलर ओळखले जाते. कुठेही जायचे असेल किंवा छोट्या वस्तू आणायला टू-व्हिलरची मदत होते. तुमची लाडकी टू-व्हिलर कधी बंद पडू नये यासाठी तिची काळजी कशी करावी याबद्दलच्या काही टिप्स पाहुयात..

टू व्हिलरसाठी सर्व्हिसिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. सर्व्हिसिंग वेळचे वेळी केल्याने गाडी दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्यास मदत होते. तसेच गाडी अचानक बंद पडण्याची शक्यताही कमी होते. योग्य सर्व्हिसिंग केल्याने टू व्हीलर विकायची असल्यास चांगली किंमत मिळते. त्यामुळे वाहनाच्या सर्व्हिसिंगबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्व्हिसिंगने मिळते दीर्घायुष्य

सततच्या वापराने बाईक, स्कूटर किंवा इतर दुचाकी यांची झीज होते. गाडी चांगली रहावी यासाठी सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. त्यामुळे संपूर्ण वाहन सुस्थितीत राहते. यामुळे वाहनाचे मायलेज आणि ब्रेकच व्यवस्थित राहील्याने गाडी अचानक खराब होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळेच वेळेवर वाहनाच्या सर्व्हिसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सर्व्हिसिंग कार्ड

नवीन टू-व्हिलर खरेदी केल्यानंतर सुरूवातीचे किती सर्व्हिसिंग फ्री आहे. त्यासाठी तूम्हाला कूपन दिले जातात. ही फ्री सर्व्हिसिंग किती महिन्यांनंतर आहे याची नोंद ठेवा. बर्‍याच कंपन्या फ्रीमध्ये एकापेक्षा जास्त सेवा देखील देतात. यामध्ये गाडी वॉश करणे, ऑईल बदलणे आणि गाडी चेक करणे यांचा समावेश असतो.

योग्य ठिकाणी सर्व्हिसिंग करा

टू-व्हिलर खरेदी केल्यानंतर काही दिवसांच्या आत पार्ट्सशी संबंधित काही समस्या आल्यास किंवा सुरू करताना, वाहन चालवताना अडचण येत असल्यास तत्काळ डीलरला कळवा. गाडीचा पार्ट मोफत बदलण्याची किंवा गरज पडल्यास गाडीच बदलण्याची सोय असते,या बद्दल माहिती घ्या.

वाहनाची मोफत सर्व्हिसिंग मिळते

अनेकदा असे घडते की, लोकांना कंपनीमध्ये नवीन वाहनाची मोफत सर्व्हिसिंग मिळते. पण त्यानंतर ते बाहेर कुठेही सर्व्हिसिंग करू लागतात. थोडे पैसे वाचवण्यासाठी गाडी इतर ठिकाणी देणे चुकीचा निर्णय ठरू शकतो. तुम्ही बाहेर सर्व्हिसिंग करून घेत असाल तरीही, मेकॅनिक किंवा सर्व्हिस सेंटर विश्वसनीय आहे का, याची खात्री करा. ज्या सर्व्हिस स्टेशनवर जॉब कार्ड बनवले गेले आहे त्याच सर्व्हिस स्टेशनवर गाडीचे काम करा.

Two Wheeler Servicing
भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी

इन्शुरन्स, ऑइल चेंज आणि ब्रेक्स

गाडीचा इंशुरन्स नेहमी वेळेवर रिन्यु करा. विम्यामध्ये काय आहे याची तपशीलवार माहिती घ्या. बहुधा टू-व्हीलर खरेदीच्या वेळी, डीलर्स तुम्हाला विमा पॉलिसी इन्शुरन्स बद्दल सांगतील. सर्व्हिसिंग करताना तुम्हाला एखादा पार्ट बदलून घ्यायचा असेल. किंवा पेंटिंगचे मोठे काम करायचे असेल तर हा विमा उपयोगी पडेल. प्रत्येक सेवेत ऑईल बदला आणि ब्रेक तपासा. इंजिन ऑइलचा दीर्घकाळ वापर केल्याने कधीही गाडी बंद पडू शकते.

टायर आणि बॅटरी

आजकाल टू-व्हिलरमध्येही अतिशय चांगल्या दर्जाचे टायर बसवले जात आहेत. परंतु कालांतराने ते त्यांची झीज होते. सतत पंक्चर झाल्याने टायर बदलणे आवश्यक आहे. लोक टायर पूर्णपणे खराब होईपर्यंत वारतात. तुम्ही तुमच्या टू-व्हिलरच्या टायरमध्ये हवा योग्य ठेवल्यास, ते नियमितपणे स्वच्छ केल्यास टायर बराच काळ टिकू शकतात. बहुतांशी सर्व्हिसिंगच्या वेळीही चांगली बॅटरी चार्ज होते. या सुविधेचाही लाभ घ्या. सर्व्हिसिंग दरम्यान, बॅटरी पूर्णपणे स्वच्छ केली आहे हे देखील तपासा.

Two Wheeler Servicing
भारत एकसंध, राहुल गांधींनी पाकिस्तानात 'भारत जोडो यात्रा' करावी : CM हिमंता सरमा

गाडीच्या कामांची यादी

सर्व्हिसिंगसाठी टू व्हीलर देताना गाडीच्या कामांची यादी करा. जेव्हा सर्व्हिसिंग करणार्‍या मेकॅनिकसोबत बोलताना यादीनुसार कामे सांगा. गाडी चालवताना काही आवाज येत आहे की नाही, क्लच नीट काम करत आहे की नाही, ब्रेक शूची स्थिती काय आहे, हॉर्न आणि इंडिकेटर काम करत आहेत की नाही. सेल्फ स्टार्ट किंवा किक मारताना काही अडचण आहे का आदी गोष्टी तपासून घेता य़ेतात.

गाडी तपासून सर्व्हिसिंगला द्या

गाडी सर्व्हिसिंगसाठी सोडण्यापूर्वी, पेट्रोल आणि बॉडी तपासा. तुम्ही कोणत्या स्थितीत वाहन सोडत आहात याची सर्व्हिसिंग करणार्‍या व्यक्तीला नोंद करा. सर्व्हिसिंग दरम्यान स्क्रॅच किंवा इतर काही आढळल्यास, सर्व्हिस सेंटरचा मालकाला त्याबद्दल विचारू शकता. तुम्ही सर्व्हिसिंगवर देताना गाडीचे फोटोही काढू शकता.

Two Wheeler Servicing
कोळसा घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई, कायदामंत्री मलय घटक यांच्या घरावर छापा

गाडीतून टूलकिट काढा

टू-व्हीलरमधून टूलकिट आणि इतर महागडे सामान काढून घ्या. जर तुम्ही तुमच्या गाडीच्या तक्रारी मेकॅनिकला समजावून सांगू शकत नसाल, तर त्याच्यासोबत गाडीवरून फेरफटका मारणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व्हिसिंग चार्जेस बाबत नेहमी स्पष्ट रहा. बिल किती होईल याबद्दल आधीच विचारा. मेकॅनिकने गाडी नीट सर्व्हिसिंग केली आहे का, याची खात्री करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com