YouTube चं नवं फिचर भारी ! लाँग व्हिडिओही करता येतील आता ६० सेकंदाचे

यूट्यूबने या नव्या फीचरला एडिट इंटू अ शॉर्ट असं नाव दिलंय. चला तर याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Edit into a short feature will be in utube soon
Edit into a short feature will be in utube soonesakal
Updated on

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच युट्युब मध्ये आता कमालीचं फिचर्स येणार आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स लांब व्हिडिओ देखील एडिट करू शकणार आहे. यूट्यूबमध्ये लाँग व्हिडिओला यूट्यूब शॉर्ट्समध्ये बदलण्याचं हे नवं टूल असणार आहे. हे टूल तुम्हाला अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्हीमध्ये उपलब्ध असणार आहे. यूट्यूबने या नव्या फिचरला 'एडिट इंटू अ शॉर्ट' असं नाव दिलंय. चला तर याबद्दलची माहिती जाणून घेऊया. ('Edit into a short' feature will be in utube soon)

यूट्यूबने 'एडिट इंटू अ शॉर्ट' या फिचरची घोषणा करताना सांगितले की, या फिचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या लांबलचक व्हिडिओला ६० सेकंदाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बदलू शकतात. या फिचरच्या मदतीने यूजर्स टेक्स्ट, फिल्टरसह त्यांच्या फोन गॅलरीमधील व्हिडिओ आणि फोटो देखील शॉर्ट करू शकतील. यूट्यूबच्या या नव्या अपडेटमुळे क्लासिक कंटेंटमध्ये अजून क्रिएटिव्ह बनवण्यास मदत होते. तसेच यामुळे यूजर्सचा वेळही वाचेल.

यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स या फिचरचा वापर करून व्हिडिओ शूटपण करू शकतात. माहितीसाठी यूजर्स फक्त त्यांच्याच व्हिडिओला एडिट करू शकतील. या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओसह तुमचा ओरीजनल व्हिडिओही तुम्हाला बघता येईल.

Edit into a short feature will be in utube soon
Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजी

प्रत्येक महिन्याला १.५ बिलियन अधिक लोक बघतात यूट्यूब शॉर्ट

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की दर महिन्याला १.५ बिलियन पेक्षा आधिक लोक यूट्यूब शॉर्ट्स बघतात. यूट्यूब शॉर्ट्सच्या व्यू बद्दल बोलायचं झाल्यास यूट्यूब शॉर्ट्सला जवळपास ३ बिलियन म्हणजेच ३०० कोटी युजर्सकडून बघितल्या जातं. एकट्या भारतात यूट्यूब बघणारे यूजर्स ४६.७ कोटीच्या घरात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com