UFO Video : अमेरिकेच्या मिलिट्री बेसवर दिसला यूएफओ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

फिल्ममेकर जेरेमी कोर्बेल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला.
The Jellyfish UFO Video
The Jellyfish UFO VideoeSakal

US Military Base UFO Video : अमेरिकेच्या इराकमधील एका मिलिट्री बेसवर चक्क उडती तबकडी दिसल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फिल्ममेकर जेरेमी कॉर्बेल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला.

या उडत्या तबकडीच्या आकारामुळे तिला 'दि जेलिफिश' नाव देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ 2018 सालचा असल्याचं म्हटलं जात आहे. जेरेमी कॉर्बेल यांनी हा व्हिडिओ मिळवून तो सर्वांसाठी शेअर केला आहे. (The Jellyfish UFO Video)

एका प्रत्यक्षदर्शीने जेरेमी यांना दिलेल्या माहितीनुसार, ही उडती तबकडी एका छोट्या तलावामधून बाहेर आली. त्यानंतर बाहेर काही काळ फिरुन पुन्हा पाण्यात जाते. त्यानंतर काही वेळानंतर ही तबकडी अचानक पाण्याबाहेर येऊन 45 डिग्रीच्या कोनात आकाशात उडून जाते. (US Military base UFO Video)

The Jellyfish UFO Video
Miami Alien : अमेरिकेतील शहरात फिरतोय दहा फुटांचा एलियन? व्हिडिओही समोर... काय आहे सत्य?

कॉर्बेल यांनी असा दावा केला आहे, की त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्तींशी चर्चा केली. सर्व व्यक्तींनी त्यांना अशाच प्रकारची माहिती दिली आहे. कॉर्बेल यांनी यापूर्वीही एका त्रिकोणी आकाराच्या उडत्या तबकडीचा आणि एका 'सिल्व्हर ऑर्ब'चा व्हिडिओही शेअर केला आहे. (UFO Video Viral)

नेटिझन्सच्या विविध प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होताच या व्हिडिओबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. "ही उडती तबकडी नाही, तर कॅमेऱ्याच्या लेन्सवर चिकटलेली एखादी वस्तू वाटत आहे", "या प्रकारच्या कॅमेऱ्यामध्ये (UAP) तर थर्मल सिग्नेचर रेकॉर्ड होत नाहीत", "अमेरिका आपल्यापासून बरंच काही लपवून ठेवत आहे.." अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर पहायला मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com