युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम! भारतात TV च्या किंमती वाढणार

Ukraine Russia War Effect on TV Manufacturing
Ukraine Russia War Effect on TV Manufacturing sakal

नवी दिल्ली : भारतात टेलिव्हिजनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कारण, सध्या युक्रेन-रशिया युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. तसेच चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागले (China Lockdown) आहेत. त्यामुळे कच्चा माल मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी भारतातील टीव्ही उत्पादकांनी मागणी आणि पुरवठ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांच्या मॉडेल्सच्या किंमती (TV More Expenssive) वाढवण्याचा विचार केला आहे.

Ukraine Russia War Effect on TV Manufacturing
Russia - Ukraine War: 9 मे पर्यंत रशिया - युक्रेन युद्ध चालणार...?

युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुमारे दोन महिन्यांच्या संघर्षाचा परिणाम जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांवर होऊ लागला आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका हा भारतातील टीव्ही निर्मात्यांना बसला आहे. युक्रेन-रशिया संकटाबरोबरच, चीनमधील लॉकडाऊनमुळे कंपन्यांना कच्चा माल मिळण्यास अडथळे येत आहेत. तसेच इंधन दरवाढीमुळे देखील उत्पादक मालाच्या शिपमेंटसाठी अधिक पैसे आकारत आहेत. परिणामी टीव्ही संचाच्या किंमती वाढ होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात कच्चा माल, सेवा आणि अंतिम उत्पादनाच्या किंमती देखील कमीत कमी पाच ते दहा टक्क्यांनी वाढतील, असे सुपर प्लास्ट्रोनिक्स (SPPL) चे सीईओ अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितले. चीनमधील लॉकडाऊनमुळे अचानक मालवाहतूक करणारी जहाजे थांबली आहेत. त्यामुळे शिपिंगमध्ये देखील विलंब होत आहे, असंही ते म्हणाले.

युक्रेन-रशिया युद्धामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. कारण टीव्हीमध्ये एक चिप बसविण्यात येतो. या चिपच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख खनिजांचे सर्वात मोठे उत्पादक रशिया आणि युक्रेन आहे. या खनिजांची आधीच कमतरता आहे. त्यामुळे निर्मितीवर परिणाम होत आहे, असं Indkal Technologies चे सीईओ आनंद दुबे म्हणाले. फक्त भारतात नाहीतर जगभरात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीची नेमकी टक्केवारी अद्याप सांगता येणार नाही. पण, येत्या काही दिवसात ही दरवाढ लागू होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com