Umang App : आता फक्त बोलून होतील 'ही' सरकारी कामं; जाणून घ्या सविस्तर

umang app to get voice-commands feature  deliver government services with voice commands
umang app to get voice-commands feature deliver government services with voice commands

उमंग अॅप (Umang App) वापरकर्त्यांसाठी सरकारने एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता उमंग अॅप म्हणजेच युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू एज ग्रीव्हन्स (Umang) व्हॉईस कमांड फीचर मिळणार आहे. म्हणजे वापरकर्ते बोलून देखील उमंग App वापरू शकतील.

Umang हा वन स्टॉप प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्ते देशभरातील ई-गव्हर्नन्स सेवेचा लाभ घेऊ शकतील. Apple च्या सिरी आणि Amazon च्या अलेक्साच्या माध्यमातून यूजर्स या सेवांचा आनंद घेऊ शकतील. हे अॅप सरकारच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फर्म Senseforth.ai कडे आपली सेवा विस्तारित करेल.

हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध

उमंग अॅपचे व्हॉईस कमांड फीचर सध्या दोन भाषांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे. पण UMANG अॅप व्हॉईस कमांड फीचर सरकारकडून लवकरच इतर 6 ते 8 भारतीय भाषांमध्ये दिले जाऊ शकते. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत, कंपनीने 50,000 हून अधिक वापरकर्त्यांसाठी टेक्स्ट-आधारित व्हर्च्युअल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला होता.

umang app to get voice-commands feature  deliver government services with voice commands
ED कारवाईनंतर राऊतांना उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा फोन

कोणत्या सेवा मिळतील

या अपडेटनंतर तुम्हाला उमंग अॅपवर बोलून अनेक प्रकारची कामे करता येतील. यामध्ये लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्यापासून ते लसीकरण स्लॉट बुक करणे, पेन्शनची रक्कम तपासणे, शिष्यवृत्तीचे स्टेटस डाउनलोड करणे अशा सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात. यासोबतच भविष्य निर्वाह निधी पासबुक आणि EPFO ​​ट्रॅकिंग क्लेम स्टेटस डाउनलोड करण्याची सुविधा व्हॉईस कमांडद्वारे प्रदान करण्यात आली आहे.

umang app to get voice-commands feature  deliver government services with voice commands
हिरोचे इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये धावते 85 किमी; पाहा किंमत

UMANG अॅपमधील व्हॉईस कमांड फीचर अलीकडेच 13 नागरिक सेवांच्या वेबसाइटसाठी लाईव्ह केले गेले. यामध्ये ई-रक्तकोश, EPFO, जन औषधी, ECIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ), राष्ट्रीय शिष्यवृत्ती, AICTE (ऑल इंडिया काउंसलिंग फॉर टेक्निकल एजूकेशन), Cowin आणि अटल पेन्शन यांसारख्या योजनांचा समावेश आहे. कंपनीकडून लवकरच अनेक नवीन सेवांसाठी व्हॉईस कमांड सेवा अपडेट केली जाऊ शकते.

umang app to get voice-commands feature  deliver government services with voice commands
मस्कची ट्विटरमध्ये एंट्री; CEO पराग अग्रवाल अन् जॅक डोर्सी म्हणतात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com