यूपीआयमधून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI app

यूपीआयमधून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान !

मुंबई : किराणा माल असो वा भाजीची खरेदी किंवा एखादे देयक भरायचे असो… आजकाल यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. यूपीआयच्या माध्यमातून कोणतेही ऑनलाइन पेमेंट सहज करता येते. UPI Paymentsच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे UPI Fraud मध्येही वाढ होत आहे. अशा फसवणुकीला बळी पडायचे नसल्यास काही चुका टाळणे आवश्यक आहे.

हेही वाचा: फिनटेक : ‘यूपीआय’चा आधुनिक अवतार

एखाद्या अनोळखी क्रमांकावरून अनोळखी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करू पाहात असेल तर त्यापासून दूर राहावे. खाद्यपदार्थ मागवताना किंवा कोणतीही वस्तू मागवण्यासाठी संपर्क क्रमांक शोधत असाल तर खुल्या माहिती स्रोतांवरील क्रमांकांवर शक्यतो विश्वास ठेवू नये. फसवणुकीचा एक सर्वात मोठा मार्ग म्हणजे ओटीपी. पैसे पाठवण्याचे आमिष दाखवून अनेकदा ओटीपी मागितला जातो. अशावेळी ओटीपी देणे टाळावे.

काहीवेळा यूपीआय उपयोजनाची नक्कल असलेली उपयोजने उपलब्ध असतात. यांद्वारे ते उपयोजन वापरणाऱ्याची वैयक्तिक माहिती गोळा करून तिचा गैरवापर होऊ शकतो. ही उपयोजना खऱ्या उपयोजनांप्रमाणेच दिसतात व डाऊनलोडसाठी सहज उपलब्ध असतात. Modi BHIM, BHIM Modi App, भीम पेमेंट-यूपीआय गाइड, भीम बँकिंग गाइड अशा उपयोजनांपासून सावध राहण्याचा सल्ला सिटी बँकेने दिला आहे.

हेही लक्षात ठेवा…

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला यूपीआय सांकेतांक सांगू नका.

अनोळखी स्रोतांकडून आलेल्या लिंक्स आणि ईमेल्सवर क्लिक करू नका.

बँकेला आपली अद्ययावत माहिती कळवत राहा.

सुरक्षित वाय-फायचाच वापर करा. खुल्या वाय-फायशी कनेक्ट करणे टाळा.

आपल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा.

Web Title: Upi Fraud Online Payment Mistakes To Make Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top