

India's Skyroot Aerospace has signed a two-launch agreement with US-based Reflect Orbital to deploy spacecraft carrying large mirrors designed to redirect sunlight to selected locations on Earth at night
esakal
अंतराळातून पृथ्वीवरील विशिष्ट भागांमध्ये रात्री सूर्यप्रकाश पोहोचवण्याची योजना अमेरिकेतील रिफ्लेक्ट ऑर्बिटल या कंपनीने आखली आहे. यासाठी अंतराळात मोठे आरसे असलेले उपग्रह पाठवण्यात येणार असून, त्यांच्या मदतीने सूर्यप्रकाश पृथ्वीवरील निवडक ठिकाणी वळवता येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीने भारतातील स्कायरूट एरोस्पेससोबत दोन प्रक्षेपणांचा करार केला आहे. या करारामुळे भारतीय खासगी अंतराळ क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी व्यावसायिक संधी मिळाली.